एक्स्प्लोर

Raj Thackeray on Har Har Mahadev : हर हर महादेव चित्रपट पाहिल्यानंतर राज ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील  'हर हर महादेव' (Har Har Mahadev) या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली.  यावेळी त्यांनी चित्रपट पाहिल्यानंतर प्रतिक्रिया दिली. 

Raj Thackeray on Har Har Mahadev:  अभिजीत देशपांडे  दिग्दर्शित  'हर हर महादेव' (Har Har Mahadev)  हा चित्रपट  25 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं नुकतेच स्पेशल स्क्रिनिंग पार पडले. लोअर परळ येथील PVR मध्ये या चित्रपटाच्या स्क्रिनिंगचे आयोजन केले होते.  या स्क्रिनिंगला अनेक दिग्गज कलाकारांनी तसेच नेते मंडळींनी हजेरी लावली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली.  यावेळी त्यांनी चित्रपट पाहिल्यानंतर प्रतिक्रिया दिली. 

काय म्हणाले राज ठाकरे? 

राज ठाकरे यांच्या आवाजातील हर हर महादेव या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवासांपूर्वी प्रदर्शित झाला. या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. आता राज ठाकरेंनी हर हर महादेव हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे म्हणाले, 'चित्रपट निर्मितीसाठी केलेली मेहनत या चित्रपटात दिसत आहे. खूप वर्षांनी उत्तम डायलॉग असलेला चित्रपट पाहिला. मी आनंद चित्रपट पाहताना भावूक झालो होतो. सहसा माझ्या डोळ्यात पाणी येत नाही. पण या चित्रपटातील काही प्रसंग पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आले. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसानं हा चित्रपट पाहिला पाहिजे.' 


अभिनेता शरद केळकर हा या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारत आहे. अभिजीत देशपांडे यांच्या लेखन आणि दिग्दर्शनातून तयार झालेला ‘हर हर महादेव’ येत्या दिवाळीत 25 ऑक्टोबरला मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमधून झी स्टुडियोजच्या माध्यमातून भारतभरात प्रदर्शित होत आहे. झी स्टुडिओज आणि श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच अभिनेता सुबोध भावे हा या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे.  अभिनेत्री अमृता खानविलकर या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. अमृता खानविलकर 'हर हर महादेव' या चित्रपटात शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पत्नीची अर्थात सोनाबाई देशपांडे यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

सुलतानी अंधार पसरलेला असताना  जिजाऊंनी स्वातंत्र्यतेचे पाहिलेले स्वप्न, बारा हजार शत्रूंवर विजय मिळवणारे आपले तीनशे मावळे आणि बाजीप्रभूंच्या रणझुंजार कर्तृत्वावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. हा चित्रपट खास दिवाळीच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Har Har Mahadev : 'हर हर महादेव' चित्रपटातील 'बाजी रं बाजी रं' गाणं रिलीज; 25 ऑक्टोबरपासून चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

महत्त्वाच्या बातम्या

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Colours Marathi Maha Episode: कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
Bhata Marathi Movie: समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra: अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Analogue paneer: महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
Ranchi Student Protest: आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
Embed widget