Parineeti Chopra and Raghav Chadha:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) नेते राघव चढ्ढा  (Raghav Chadha)  हे दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.  काही दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा पार पडला. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. साखरपुड्यानंतर राघव आणि परिणीती यांना अनेकवेळा एकत्र स्पॉट करण्यात आलं. आता राघव आणि परिणीती यांचे  उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले आहेत. येथील त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या दोघांनी महाकाल देवाचे दर्शन घेतले आहे. 


ANI च्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.  या व्हिडीओमध्ये परिणीती आणि राघव हे महाकालेश्वर मंदिरात प्रार्थना करताना दिसत आहेत.  'राघव चढ्ढा आणि त्यांची होणारी पत्नी अभिनेत्री परिणीती चोप्रा यांनी उज्जैनमधील महाकाल मंदिरात प्रार्थना केली.' असं या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं आहे.






कधी होणार राघव आणि परिणीती यांचे लग्न?


परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा 13 मे 2023 रोजी दिल्लीमध्ये साखरपुडा झाला होता. आता हे दोघे लग्न कधी करणार आहेत? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. 25 सप्टेंबर 2023 रोजी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा लग्नबंधनात अडकणार आहेत, असं म्हटलं जात आहे.


पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, लोकप्रिय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबतच अनेक दिग्गज मंडळींनी परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती. 






परिणीतीचे चित्रपट


परिणीतीच्या आगामी चित्रपटांची तिचे चाहते उत्सुकतेने वाट बघत असतात. परिणीती ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते. 'चमकिला' या आगामी चित्रपटामध्ये परिणीती ही दिलजीत दोसांझसोबत काम करणार आहे.इश्कजादे, शुद्ध देसी रोमान्स, हसी तो फसी, दावत-ए-इश्क यांसारख्या हिट चित्रपटांमधून परिणीती ही प्रेक्षकांच्या भेटीस आली .


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Parineeti Chopra Raghav Chadha Wedding : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची लगीनघाई! 'या' दिवशी शाही थाटात अडकणार लग्नबंधनात