Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Date : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वी साखरपुड्याचे फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी झाली. तेव्हापासून चाहते त्यांच्या लग्नाची प्रतीक्षा करत आहे. पण चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा (Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Update) यांचा लग्नाचा मुहूर्त ठरला आहे.
परिणीती चोप्रा - राघव चड्ढा 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात (Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Date)
मीडिया रिपोर्टनुसार, 24 सप्टेंबर 2023 रोजी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा लग्नबंधनात अडकणार आहेत. अद्याप दोघांनीही यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही. शाही थाटात त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. जवळपास एक आठवडा त्यांचा हा लग्नसोहळा असेल. दोघांचे कुटुंबीय, मित्रमंडळी आणि राजकीय-सिनेविश्वातील अनेक नामांकित मंडळी या लग्नसोहळ्याला हजेरी लावणार आहेत.
परिणीती-राघवचा लग्नसोहळा कुठे होणार?
परिणीती आणि राघव यांच्या डेस्टिनेशन वेडिंगच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. हे जोडपं राजस्थानमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वी दोघांनी राजस्थानच्या उदयपूर पर्यटन विभागाच्या उपसंचालकांची भेट घेत तेथील उत्तम ठिकाणे आणि हॉटेल्सची माहिती घेतली होती. आता हे जोडपे राजस्थानमध्ये लग्न करणार आणि गुडगावमध्ये रिसेप्शन ठेवणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा 13 मे 2023 रोजी दिल्लीत साखरपुडा झाला होता.
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांच्या लग्नसोहळ्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. परिणीती आणि राघव अनेकदा मुंबई किंवा दिल्ली विमानतळावर एकत्र स्पॉट होतात. चाहत्यांना आता त्यांच्या लग्नाची उत्सुकता आहे.
राघव चढ्ढा परिणीतीला पहिल्यांदा कुठे भेटले? (Parineeti Chopra Raghav Chadha Love Story)
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा पंजाबमध्ये एकमेकांना पहिल्यांदा भेटले. पंजाबमध्ये एका सिनेमाचं शूटिंग करत असताना परिणीती राघवला पहिल्यांदा भेटली. त्यानंतर त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. गेल्या सहा महिन्यांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत असे म्हटले जात आहे. तेव्हापासूनच त्यांच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली.
संबंधित बातम्या