Arrest UP Teacher : उत्तर प्रदेशातील (UP) मुझफ्फरनगर जिल्ह्यातील एका शाळेमधील एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक शिक्षिका विद्यार्थाला मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वसामान्यांसह बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील संतापले आहेत. रेणुका शहाणे (Renuka Shahane), स्वरा भास्कर (Swara Bhasker) आणि प्रकाश राज (Prakash Raj) यांनी ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे. 


नेमकं प्रकरण काय? 


विद्यार्थाला पाचचा पाढा येत नाही त्यामुळे शिक्षिकेने इतर विद्यार्थ्यांकडून त्या मुलाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.उत्तर प्रदेशातील एका शिक्षिकेने वर्गातील इतर विद्यार्थांना एका मुलाला मारहाण करण्यास सांगितले. शिक्षिकेच्या सांगण्यानुसार विद्यार्थीदेखील आलटून-पालटून त्या एका विद्यार्थाला बेदम मारहाण करत आहेत. त्यानंतरही शिक्षक त्या मुलांना आणखी जोरजोरात मारायला सांगत आहेत. मारहाण करण्यात आलेला विद्यार्थी हा मुस्लिम असल्याचा दावा केला जात आहे. आता त्या मुस्लिम विद्यार्थाच्या वडिलांनी त्याला त्या शाळेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 


उत्तरप्रदेशातील हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनीदेखील या प्रकरणाची दखल घेतली आहे. तसेच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी या घटनेबाबत भाजपवर हल्लाबोल केला आहे. शिक्षकाने वर्गात विद्यार्थाला मारहाण केल्याने बॉलिवूड सेलिब्रिटी संतापले असून त्या शिक्षकाला अटक करण्याची मागणी करत आहेत.


मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवणारी अभिनेत्री रेणुका शहाणेनं ट्वीट केलं आहे की,"या शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घ्यावे. त्याला राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळू शकतो..माझा प्रिय देश".






बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने (Swara Bhaskar) ट्वीट केलं आहे,"हिंदू बांधवांना धक्का बसला आहे. तुम्ही भाजपला मत दिले असेल आणि धर्मांधता आणि द्वेषाला तोंड देत 'उद्दिष्ट' किंवा 'तटस्थ' राहण्याचा प्रयत्न केला असेल. आज तुम्हा पुण्य मिळणार नाही. मुझफ्फरनगर पोलिसांनी लवकरात लवकर संबंधित शिक्षकावर कारवाई करावी".






प्रकाश राज (Prakash Raj) यांनी ट्वीट केलं आहे की,"मानवतेची सर्वात काळी बाजू ज्यामध्ये आपण प्रवेश करत आहोत". 






संबंधित बातम्या