(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Puneet Issar : 'महाभारत' फेम अभिनेता फसवणुकीचा बळी; नेमकं प्रकरण काय?
Puneet Issar : 'महाभारत' फेम अभिनेते पुनीत इस्सार फसवणुकीचा बळी ठरला आहे.
Puneet Issar : 'महाभारत' (Mahabharat) फेम अभिनेते पुनीत इस्सार (Puneet Issar) सध्या चर्चेत आहे. पुनीत यांचं खातं हॅक करून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. आता या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मीडिया रिपोर्टनुसार, एका व्यक्तीने पुनीत इस्सार यांचे 13.76 लाख रुपये हडप करण्याचा प्रयत्न केला आहे. पुनीत इस्सार यांच्या दक्षिण मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान आरोपीने सर्वात आधी अभिनेत्याचा ईमेल हॅक केला. त्यांनंतर 13.76 लाख रुपये चोरण्याचा प्रयत्न केला. काही कारणाने पुनीत यांनी ईमेल पाहिला तेव्हा ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आली.
फसवणुकी प्रकरणी पुनीत इस्सर यांनी ओशिवरा पोलिस चौकीत तक्रार नोंदवली. दरम्यान पोलिस अधिकाऱ्याने सांगितले," आरोपीवर भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदीनुसार फसवणूक आणि इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या आरोपीला 28 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे".
View this post on Instagram
पुनीत इस्सार हे महाभारतातील दुर्योधनाच्या भूमिकेसाठी ओळखले जातात. या भूमिकेने त्यांना घराघरांत ओळख दिली. अनेक मालिका आणि सिनेमांत त्यांनी काम केलं आहे. भाईजानच्या बिग बॉसमध्येही ते झळकले होते. पुनीत इस्सार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘द काश्मिर फाइल्स’ या सिनेमातदेखील काम केलं आहे.
पुनीत इस्सार यांच्या आधी ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांची फसवणूक करण्यात आली होती. एका व्यक्तीने कपूर यांना फोन केला होता आणि त्यांना सांगितलं की, तुमचं केवायसी अपडेट झालेलं नाही. ते अपडेट करणं आवश्यक आहे. तसेच त्या व्यक्तीने नंतर अन्नू कपूर यांचे बॅंक खाते तपशील आणि ओटीटी शेअर करण्यास सांगितले. अन्नू कपूर यांना तो व्यक्ती बॅंक कर्मचारी आहे असं वाटलं आणि त्यांनी त्या व्यक्तीला सर्व तपशील दिले. त्यांनी ओटीटी देताच त्यांच्या अकाऊंटमधून पैसे काढण्यात आले. भामट्याने 2 लाख आणि 2.36 लाखांचे दोन व्यवहार करत कपूर यांची फसवणूक केली.
संबंधित बातम्या