एक्स्प्लोर

Prabhas on Ram Mandir : प्रभासने राम मंदिरासाठी दिली 50 कोटी रुपयांची देणगी? प्राण प्रतिष्ठा सोहळ्यातील जेवणाचा खर्च उचलणार; समोर आलं सत्य

Prabhas : प्रभासने राम मंदिर (Atodhya Ram Mandir) प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी 50 कोटी रुपये दान केल्याची चर्चा आहे. तसेच या सोहळ्यादरम्यान जेवणाचा खर्चही अभिनेता उचलणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Prabhas Donate 50 Crores for Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिर (Ram Mandir) प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित असणार आहेत. अशातच आता दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासने (Prabhas) राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी 50 कोटी रुपये दान केल्याची चर्चा आहे. तसेच या सोहळ्यादरम्यान जेवणाचा खर्चही अभिनेता उचलणार असल्याचं म्हटलं जात आहे.

'सालार'आधी (Salaar) प्रभासचा 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात प्रभास रामाच्या भूमिकेत होते. वादाच्या भोवऱ्यात अडकलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. पण आता प्रभास एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे.

प्रभासने राम मंदिरासाठी 50 कोटी रुपयांची देणगी दिल्याची चर्चा आहे. तसेच आंध्र प्रदेशचे  आमदार चिरला जग्गिरेड्डी यांनी दावा केला होता की, प्राण प्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान प्रभास जेवणाचा सर्व खर्च उचलेल. 

नेमकं सत्य काय? 

प्रभासच्या टीमने इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, प्रभासने राम मंदिरासाठी 50 कोटी रुपये दान केल्याची बातमी खोटी आहे. अफवा पसरवल्या जात आहेत. तो जेवणाचा खर्च उचलणार हीदेखील खोटी बातमी आहे. तर दुसरीकडे 'हनुमान'च्या (Hanuman) रिलीजआधी चिरंजीवीने घोषणा केली होती की, सिनेमाच्या प्रत्येक तिकीटावरचे पाच रुपये राम मंदिरासाठी दान करणार". 

प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला 'हे' सेलिब्रिटी राहणार उपस्थित

अयोध्येत होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान अनेक सेलिब्रिटी उपस्थित असणार आहेत. यात अमिताभ बच्चन, कंगना रनौत, टायगर श्रॉफ, माधुरी दीक्षित, आलिया भट्ट, रणबीर कपूर, अजय देवगन, रजनीकांत, धनुष, यश, प्रभास, राम चरणसह अरुण गोविल, दीपिका चिखलियासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित असणार आहेत. 

प्राण प्रतिष्ठा मुहूर्त (Ram Mandir Pran Pratishtha 2024 Muhurat)

अयोध्येतील राम मंदिरासाठी जवळपास पाच शतकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. 22 जानेवारी 2024 रोजी सकाळी 12.29 ते 12:30 पर्यंत राम मंदिरात रामलल्लाची मूर्ती स्थापन करण्याची वेळ असेल. प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ 84 सेकंदांचा शुभ मुहूर्त असे.

प्रभासच्या आगामी कलाकृतींबद्दल जाणून घ्या.. (Prabhas Upcoming Movies)

प्रभासचा 'सालार' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. जगभरात या सिनेमाने 700 कोटींची कमाई केली. बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा घरबसल्या पाहू शकतात. 'सालार'नंतर सुपरस्टार 'द राजा साब' या भयपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच 'सालार 2', 'कल्कि 2898 एडी' आणि 'स्पिरिट' हे प्रभासचे आगामी सिनेमे आहेत.

संबंधित बातम्या

Ram Mandir : उद्योगपती आणि खेळाडूंसोबतच 'या' सेलिब्रिटींनाही प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण, पाहा संपूर्ण यादी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Embed widget