एक्स्प्लोर
जगप्रसिद्ध ‘कान्स’ फेस्टिव्हलसाठी ‘पठार’ची निवड

मुंबई : जागतिक चित्रपटाची पंढरी समजल्या जाणाऱ्या प्रसिद्ध ‘कान्स’ (Cannes) चित्रपट महोत्सवासाठी ‘पठार’ या मराठी लघुपटाची निवड झाली आहे. लेखक सतीश तांबे यांच्या कथेवर आधारित ‘पठार’ लघुपट आहे.
सतीश तांबे याच्या ‘पठारावर अमर’ या कथेवर आधारित ‘पठार’ लघुपट आहे. ‘पठार’ची निर्मिती, दिग्दर्शन आणि पटकथा निखिलेश चित्रे यांची आहे.
स्वप्निल शेटे यांनी या लघुपटाचं छायाचित्रण आणि संपादन केलं असून, त्यात राहुल तिवरेकर, तुषार पवार, केवल नागवेकर, हरिता पुराणिक आणि मानसी पुंडलीक यांच्या प्रमुखभूमिका आहेत. कान्स चित्रपट महोत्सवात हा लघुपट ‘शॉर्ट फिल्म कॉर्नर’ या विभागाअंतर्गत दाखवला जाणार आहे.
डिसेंबर महिन्यात मुंबईत झालेल्या ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवात ‘पठार’ला रसिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. ‘पठार’चं प्रदर्शन लवकरच विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
