Pathaan: पठाण चित्रपटावरून बजरंग दल आक्रमक; पुण्यातील पोस्टर हटवले

पुण्यातील (Pune) राहुल चित्रपटगृहाच्या बाहेरील पठाण (Pathaan) चित्रपटाचे पोस्टर बजरंग दलाकडून काढण्यात आले आहे. शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) काही चाहत्यांनी चित्रपटगृहाबाहेर हे पोस्टर लावले होते.

Continues below advertisement

Pathaan: अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) चित्रपटावरून पुण्यात (Pune) बजरंग दल आक्रमक झाले आहे.  पुण्यातील राहुल चित्रपटगृहाच्या बाहेरील पोस्टर बजरंग दलाकडून काढण्यात आले आहे. शाहरुख खानच्या काही चाहत्यांनी चित्रपटगृहाबाहेर हे पोस्टर लावले होते. बजरंग दलानं राहुल थिएटरच्या चालकांना इशारा देऊन पोस्टर काढण्याची विनंती केली. त्यानंतर हे पोस्टर हटवण्यात आलं. 

Continues below advertisement

पठाण अडकला वादाच्या भोवऱ्यात

शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाला हिंदुत्ववादी संघटना या विरोध करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पठाण चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी देखील सोशल मीडियावर केली जात आहे. पठाण या चित्रपटातील बेशरम रंग आणि झुमे जो पठाण ही गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली. यामधील बेशरम गाण्यामधील दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone) बिकिनीच्या रंगामुळे वाद निर्माण झाला होता. अनेकांनी दीपिकाच्या बिकिनीच्या रंगावर टीका केली होती. त्यानंतर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला. 

25 जानेवारी रोजी पठाण येणार प्रेक्षकांच्या भेटीस

पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. भारताव्यतिरिक्त स्पेन, यूएई, तुर्की, रशिया, सायबेरिया, इटली, फ्रान्स आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण झाले आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषेंमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शन केलं आहे.

शाहरुखसोबतच पठाण चित्रपटात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.  250 कोटींच्या बजेटमध्ये 'पठाण' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. शाहरुखचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

शाहरुखचे आगामी चित्रपट

पठाण या चित्रपटाबरोबरच शाहरुखचे जवान आणि डंकी हे आगामी चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. यामधील जवान हा चित्रपट  2 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असं म्हटलं जात आहे. रिपोर्टनुसार, जवान चित्रपटात अभिनेता  विजय सेतुपती देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Shah Rukh Khan: पठाणच्या रिलीजआधी शाहरुखनं चाहत्यांना दिलं सरप्राइज; मन्नत बाहेरील व्हिडीओ शेअर करत म्हणाला, 'सॉरी पण...'

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola