Shah Rukh Khan Pathaan Movie Tickets Price : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) आगामी 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. एकीकडे या सिनेमाला विरोध होत असताना दुसरीकडे मात्र शाहरुखचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'फर्स्ट डे फर्स्ट शो' पाहण्यासाठी चाहते तब्बल 2100 रुपयांत 'पठाण'चं तिकीट बुक करत आहेत. 

Continues below advertisement

किंग खानची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुर असतात. आता रोमान्सचा बादशाह शाहरुख खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. त्यामुळे चाहते त्याचा सिनेमा पाहण्यासाठी काहीही करायला तयार आहेत. लाडक्या सेलिब्रिटीचा सिनेमा पाहण्यासाठी ते हजारो रुपये खर्च करत तिकीट विकत घेत आहेत. 

'पठाण' या बहुचर्चित सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला 20 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. 2400, 2200 आणि 2000 रुपयांना या सिनेमाचं तिकीट विकलं जात आहे. त्यामुळे 'फर्स्ट डे फर्स्ट शो'सह 'पठाण'चे अनेक शो हाऊसफुल्ल जाणार आहेत. 

Continues below advertisement

विरोधादरम्यान चाहत्यांचं शाहरुखवरचं प्रेम कायम!

'पठाण' हा सिनेमा रिलीजआधीच रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. अॅडव्हान्स बुकिंग सुरू होऊन तीन दिवस झाले असून तीन दिवसात या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. ओपनिंग डेला पीव्हीआरचे (PVR) 1,30,000 तिकीट, आयनॉक्स (INOX) 1,13,000 आणि सिनेपोलिसच्या (Cinepolis) 57,500 तिकीटांची विक्री झाली आहे. अशाप्रकारे आतापर्यंत एकूण 3,00,500 तिकीटांची विक्री झाली आहे. त्यामुळे सिनेमाच्या विरोधादरम्यान आम्ही शाहरुखच्या पाठीशी आहोत असं अप्रत्यक्षरित्या चाहत्यांनी दाखवून दिलं आहे. 

काही मल्टीप्लेक्समध्ये 2100 रुपयांत 'पठाण'चं तिकीट विकलं जात आहे. तर या सिनेमाच्या मॉर्निंग शोचे तिकीटदेखील 1000 रुपयांत विकले जात आहेत. रिपोर्टनुसार, आतापर्यंत या सिनेमाने 14.66 कोटींचा गल्ला जमवला आहे. 

'पठाण' हा सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात किंग खानचा (King Khan) एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमासाठी शाहरुखने खूप मेहनत घेतली असून तो दीपिका पादुकोणसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. जॉन अब्राहमदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. 

संबंधित बातम्या

Shah Rukh Khan: पठाणच्या रिलीजआधी शाहरुखनं चाहत्यांना दिलं सरप्राइज; मन्नत बाहेरील व्हिडीओ शेअर करत म्हणाला, 'सॉरी पण...'