Kabir bedi costar Rekha : बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी कलाकारांना मोठा संघर्ष करावा लागतो. दरम्यान, संघर्ष करुन मोठं नाव कमावल्यानंतर वयाच्या 70 व्या वर्षी आपल्या स्टाईल आणि ग्लॅमरने तरुण अभिनेत्रींना टक्कर देणारी अभिनेत्री म्हणजे रेखा... मात्र, एक काळ असा होता, की कोणताही निर्माता, दिग्दर्शक त्यांच्या अभिनय क्षमतेवर विश्वास ठेवायला तयार नव्हता. बॉलीवूडमध्ये त्यांच्याविषयी "डायन", "चुडैल" अशा अपशब्दांचा वापर केला जात होता.
लहान वयात दक्षिणेतील चित्रपटसृष्टीत कामाला सुरुवात
रेखा यांनी आपल्या करिअरची सुरुवात खूप लहान वयातच दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतून केली. त्या जेमिनी गणेशन आणि पुष्पावल्ली यांची कन्या. लहान वयातच घराची जबाबदारी रेखा यांच्या खांद्यावर आली होती. दोन वेळचं जेवण मिळावं म्हणून, स्वतःची इच्छा नसतानाही, त्यांनी आपल्या आईच्या आग्रहामुळे चित्रपटांकडे वळावं लागलं. काही काळातच त्या दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री बनल्या.
बॉलीवूडमध्ये स्टारडम मिळवणं झालं होतं कठीण
रेखा यांनी जेव्हा हिंदी चित्रपटांकडे वळण्याचा निर्णय घेतला, तेव्हा कुणीही त्यांच्यासोबत काम करायला तयार नव्हतं. खून भरी मांग या राकेश रोशन दिग्दर्शित चित्रपटात रेखा यांच्यासोबत कबीर बेदी यांनी भूमिका केली होती. कबीर बेदी या चित्रपटात अत्यंत निर्दयी खलनायकाच्या भूमिकेत होते, जो आपल्या पत्नीला लोभापोटी मगरींच्या तलावात फेकतो. या चित्रपटात रेखा यांनी दुहेरी भूमिका साकारली होती. त्यांच्या मॉडर्न लूकने प्रेक्षकांना भुरळ घातली आणि त्यांच्या अभिनयाची सर्वत्र प्रशंसा झाली.
काळी-कुरुप म्हणत नाकारलं जायचं
कबीर बेदी यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, रेखा यांच्या सुरुवातीच्या काळात निर्माता-दिग्दर्शक त्यांना "काळी", "कुरुप", "घाणेरडी" अशी विशेषणे लावत असत आणि त्यांना चित्रपटातून नाकारलं जायचं. अनेक निर्माते त्यांना दक्षिणेहून आलेली “निकृष्ट अभिनेत्री” समजत आणि त्यांना संधी द्यायला तयारच नव्हते.
सुनील दत्तसोबत जोडले गेले होते नाव
रेखा यांच्या नावे अनेक अभिनेत्यांशी प्रेमसंबंध जोडले गेले, त्यामुळे त्यांची प्रतिमा खराब झाली होती. एक काळ असा होता, की त्यांनी सुनील दत्त यांच्यासोबत अनेक चित्रपटांत काम केलं. त्याच दरम्यान दोघांचं नाव जोडलं गेलं. ही बातमी समजताच सुनील दत्त यांच्या पत्नी नरगिस अत्यंत संतप्त झाल्या होत्या.
नर्गिसने रेखाला म्हटलं होतं डायन
Koimoi च्या अहवालानुसार, जेव्हा नर्गिस यांना रेखा आणि सुनील दत्त यांच्याबद्दल ऐकायला मिळालं, तेव्हा त्या आपलं भान हरपल्या. त्यांनी रेखावर थेट आरोप करत ती "मुलांना इशारे करणारी" असून "डायनसारखीच आहे" असं वक्तव्य केलं. नरगिस यांचा रोष सार्वजनिकरित्या प्रकट झाला होता.
पतीच्या मृत्यूनंतर पुन्हा टीकेचा सामना
1990 साली रेखा यांनी उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्याशी विवाह केला. मात्र लग्नाच्या अवघ्या एका वर्षात त्यांनी आत्महत्या केली, आणि रेखा पुन्हा एकदा बॉलीवूडच्या टीकेचे लक्ष्य बनल्या. खून भरी मांग फेम रेखा यांना त्या काळात “चुडैल” आणि “डायन” अशा अपशब्दांनी हिणवलं गेलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या