The Legend of Maula Jatt: पाकिस्तानी चित्रपट 'द लेजेंड ऑफ मौला जट्ट' ला जगभरातील प्रेक्षकांची पसंती; भारतात कधी होणार रिलीज?
'द लेजेंड ऑफ मौला जट्ट' (The Legend of Maula Jatt) या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर जवळपास 220 कोटींची कमाई केली आहे.
The Legend of Maula Jatt: 'द लेजेंड ऑफ मौला जट्ट' (The Legend of Maula Jatt) हा पाकिस्तानी चित्रपट सध्या जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट 13 ऑक्टोबरला रिलीज झाला. 'द लेजेंड ऑफ मौला जट्ट' मध्ये अभिनेता फवाद खान (Fawad Khan) आणि अभिनेत्री माहिरा खान (Mahira Khan) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर जवळपास 220 कोटींची कमाई केली आहे.
UK मध्ये, 1.39 दशलक्ष कमाई केल्यानं हा चित्रपट पद्मावतनंतर 2018 चा दक्षिण आशियातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. नॉर्वेमध्ये देखील या चित्रपटानं चांगली कमाई केली. गल्फ,अमेरिका आणि यूरोप या देशांमधील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं धुमाकूळ घातला. 'द लेजेंड ऑफ मौला जट्ट' या चित्रपटातील फनाद खानच्या अभिनयाचं अनेक लोक कौतुक करत आहेत.
'द लेजेंड ऑफ मौला जट्ट' हा चित्रपट 1979मध्ये आलेल्या युनुस मलिक दिग्दर्शित ‘मौला जट’ चित्रपटाचा रिमेक आहे. फवाद खानच्या चित्रपटाने ओपनिंग वीकेंडला 51 कोटींचे रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले. 'द लीजेंड ऑफ मौला जट' हा चित्रपट 25 देशांमध्ये सुमारे 500 स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे.
'द लेजेंड ऑफ मौला जट्ट' भारतात कधी रिलीज होणार?
रिपोर्टनुसार, हा चित्रपट 23 डिसेंबरला भारतात प्रदर्शित होऊ शकतो, असं म्हटलं जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.यापूर्वी फवाद खान आणि माहिरा खान यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते भारतातही खूप लोकप्रिय आहेत. त्यांची 'हमसफर' ही प्रसिद्ध मालिकाही येथे हिट झाली होती.
View this post on Instagram
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: