India Vs Pak T20: स्ट्रेलियातील मेलबर्न येथे भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात T20 विश्वचषक सामना झाला. या सामन्यात भारतानं चार विकेट राखून पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतानं विजय मिळवल्यानंतर भारतात उत्साहाचं वातावरण होते. पण मोमिन साकिबनं या पाकिस्तानी अभिनेत्यानं भावनिक पोस्ट शेअर करत सामन्यामध्ये पराभव झाल्यानं दु:ख व्यक्त केलं.
मोमिन साकिबनं शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये तो स्टेडियममध्ये रडताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये तो एमर्जेन्सी रुममध्ये जाताना दिसत आहे. या व्हिडीओला त्यानं कॅप्शन दिलं, 'माझ्यासाठी प्रार्थना करा. हे लोक मला एमर्जेन्सी रुममध्ये घेऊन जात आहेत.' मोमिनचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कोण आहे मोमिन साकिब?
मोमिन साकिब हा पाकिस्तानी अभिनेता आहे ज्याला ‘ओह भाई..मारो मुझे मारो’आणि‘एक दम से वक्त बदल दिया..जज्बात बदल दिए..जिंदगी बदल दी’ या त्याच्या डायलॉग्समुळे विशेष लोकप्रियता मिळाली. एका सामन्यानंतर मोमिननं स्टेडियमच्या बाहेर हे डायलॉग्स म्हटले होते. त्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी मोमिनच्या या डायलॉग्सचे मिम्स तयार केले.
नो बॉल नव्हता
मोमिन साकिबने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो काही लोकांसोबत आपले दु:ख व्यक्त करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये मोमिन लोकांना तो बॉल नो बॉल नसल्याचे सांगत आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या