एक्स्प्लोर
'त्या' दिग्दर्शकाने अंतर्वस्त्रांशिवाय फोटोशूट करायला सांगितले होते : कंगना राणावत
बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कंगना राणावतने निर्माते-दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्यावर मोठा आरोप केला आहे.

Indian Bollywood Star Actress Kangana Ranaut Speaks to media person during A promotional Event on January 25,2019 in Kolkata City in India. (Photo by Debajyoti Chakraborty/NurPhoto via Getty Images)
मुंबई : बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कंगना राणावतने निर्माते-दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्यावर मोठा आरोप केला आहे. कंगना म्हणाली की, "निहलानी यांच्या 'आय लव्ह यू बॉस' नावाच्या एका चित्रपटात मी काम करणार होते. या चित्रपटासाठी त्यांनी मला अतर्वस्त्र न घालता केवळ रोब (पारदर्शक गाऊन)घालून फोटोशूट करायला सांगितले होते." कंगनाच्या या आरोपामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
कंगनाने सांगितले की, हा चित्रपट एक सॉफ्ट पॉर्न चित्रपट होता. चित्रपटातील माझी एका मुलीची भूमिका होती, जिच्या मनात तिच्या बॉसविषयी लैंगिक भावना आहेत. परंतु भूमिकेविषयी आणि फोटोशूटबद्दल ऐकल्यानंतर मी त्या चित्रपटाला नकार देऊन तिथून पळ काढला. यानंतर मी खूप दिवस लोकांपासून लांब होते, मी माझा फोन नंबरदेखील बदलला होता.
बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेत लोकांना सहजासहजी प्रवेश मिळत नाही. अनेकांना त्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागतो. अनेक कलाकारांना या काळात इंडस्ट्रीतल्या प्रस्थापित कलाकार, निर्मात्या-दिग्दर्शकांकडून होणाऱ्या त्रासाला सामोरे जावे लागते. कंगना राणावतदेखील त्याला अपवाद नाही. बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना तिलाही अनेक वाईट प्रसंगांना तोंड द्यावे लागले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
सोलापूर
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
