Sanjay Chouhan Death : 'पान सिंह तोमर'चे लेखक संजय चौहान यांचे वयाच्या 62 व्या वर्षी निधन; दुपारी होणार अंत्यसंस्कार
Sanjay Chouhan : 'पान सिंह तोमर' या सिनेमाचे लेखक संजय चौहान यांचे वयाच्या 62 व्या वर्षी निधन झाले आहे.
Sanjay Chouhan Passed Away : 'पान सिंह तोमर' (Paan Singh Tomar) या सिनेमाचे लेखक संजय चौहान (Sanjay Chouhan) यांचे निधन झाले आहे. मुंबईतील एका रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी वयाच्या 62 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
संजय चौहान यांच्या पश्चात पत्नी सरिता आणि मुलगी सारा आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय यांची प्रकृती खालावली होती. लिव्हर संबंधी आजाराने त्यांना ग्रासलं होतं. 'पान सिंह तोमर' (Paan Singh Tomar), 'आय एम कलाम' (I Am Kalam), 'साहेब बीवी गैंगस्टर' (Saheb Biwi Gangster) अशा अनेक सिनेमांचं लेखन संजय चौहान यांनी केलं आहे.
'आय एक कलाम' (I am Kalam) या सिनेमासाठी संजय चौहान यांना 2011 साली फिल्मफेअर पुरस्काराने (Filmfare Awards) सन्मानित करण्यात आले होते. संजय यांचे 'मैंने गांधी कौ नहीं मारा' (Maine Gandhi Ko Nahin Mara) आणि 'धूप' (Dhoop) सारखे सिनेमेदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय चौहान यांचा जन्म मध्यप्रदेशात झाला आहे. त्यांचे वडील रेल्वेत कामाला होते. तर आई एका शाळेत शिक्षिकेचे काम करायची. संजय यांनी पत्रकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. पण 1990 साली सोनी टीव्हीवरील एका मालिकेच्या माध्यमातून त्यांनी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं.
Wrote Paan Singh Tomar, Highway, I am Kalam, Sahib Biwi Gangster, among other films.
— Mayank Shekhar मयंक शेखर (@mayankw14) January 13, 2023
Former journalist. Fabulous raconteur. A thinking man. Fine, friendly, warm presence, always adding life to an evening. Will be missed forever. #SanjayChouhan pic.twitter.com/UkBRYoms9P
#PaanSinghTomar writer #SanjayChouhan passes away aged 62https://t.co/dOMlvvkxw2
— Pinkvilla (@pinkvilla) January 13, 2023
आज दुपारी गोणार अंत्यसंस्कार
संजय चौहान यांच्या पार्थिवावर आज दुपारी 12.30 वाजता मुंबईतील ओशिवरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. ते बॉलिवूडमधील एक लोकप्रिय लेखक होते. अनेक सेलिब्रिटी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत.
संबंधित बातम्या