who is Mikey Madison :ऑस्कर हा सिनेक्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार मानला जातो. जगात असे काही कलाकार आहेत, जे सिनेमालाच श्वास समजून आपलं आयुष्य खर्ची घालतात. अशाच महारथींची दखल ऑस्कर पुरस्कार देऊन केली जाते. दरम्यान, आज अमेरिकेतली लॉस एंजेलीस येथे 97 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडत आहेत. या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोण पटकावणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. या पुरस्कारावर अवघ्या 25 वर्षांच्या मिकी मॅडीसनने पटकावला आहे.
25 वर्षांच्या अभिनेत्रीने ऑस्कर पटकावला
मिकी मॅडीसनने डेमी मूर यासारख्या दिग्गज अभिनेत्रींनाही मागे टाकलंय. अवघ्या 25 वर्षांच्या मिकी मॅडीसनने ऑस्कर पुरस्कार जिंकलाय. अनोरा (Anora) या चित्रपटासाठी तिला हा पुरस्कार देण्यात आला आहे. तिच्या स्पर्देत डेमी मूर ही अभिनेत्री होती. ऑस्कर पुरस्काराच्या स्पर्धेत असणाऱ्या इतर अभिनेत्रींच्या तुलनेत 25 वर्षांची मिकी मॅडीसन ही अगदीच नवखी आहे. ती सिनेक्षेत्रात 2013 सालापासून सक्रीय आहे. अनोरा या चित्रपटात मिकी मॅडीसनने मुख्य नायिकेची भूमिका पार पाडली होती.
याआधी तिने इतर सिनेमांत छोट्या-छोट्या भूमिका केलेल्या आहेत. क्वेंटिन टोरँटिनो यांचा वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवुड, 2022 साली आलेला स्क्रीम, बेटर थिंग्स या चित्रपटातही भूमिका केलेली आहे.
डेमी मूरला टाकलं मागे
डेमी मूरच्या तुलनेत मिकी मॅडीसन ही नवखी आहे. डेमी मूर सिनेक्षेत्रात साधारण 80 च्या दशकांपासून सक्रीय आहे. हॉलिवुडमधील प्रतिष्ठीत आणि मोठ्या अभिनेत्रींपैकी एक अशी तिची ओळख आहे. तिचा द सबस्टन्स हा चित्रपट फारच गाजला होता. या चित्रपटानंतर तिला खरी ओळख मिळाली. मात्र मूरला मागे टाकत मिकी मॅडीसन हिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ऑस्कर पुरस्कार पटकावला. ऑस्कर पुरस्का सोहळ्यात एड्रियन ब्रॉडी याने सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ऑस्कर पटकावला आहे. तर सर्वोत्कृष्ट सहकलाकार म्हणून किरन कल्किन यांनी ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरलं आहे.
हेही वाचा :
Samantha Ruth Prabhu: समंथाने फिल्म इंडस्ट्रीत पूर्ण केली 15 वर्षे, तिचे फोटो पाहून यूजर्स म्हणाले..