Anjali Arora on Deepfake Video: प्रसिद्ध सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर (Social Media Influencer) अंजली अरोरा (Anjali Arora) सध्या तिच्या प्रोफेशनल लाईफऐवजी, वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी कंगना रनौतचा (Kangana Ranaut) शो लॉकअपमध्ये (Lockup) अंजली अरोरा दिसून आली होती. या शोमध्ये तिनं मांडलेल्या तिच्या मतांमुळे ती प्रसिद्धीझोतात आली होती. अशातच आता पुन्हा एकदा ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अंजली अरोराने रशियनसोबत जाण्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. तसेच, काही दिवसांपूर्वी तिच्या लीक झालेल्या एमएमएसबद्दलही अंजली अरोरानं मोठं वक्तव्य केलं आहे. त्यासोबतच अंजली अरोरा याप्रकरणी कंगना रणौतवर नाराजी व्यक्त केली आहे.
माझा फेक MMS Viral
अंजली अरोरा एक पॉडकास्ट शोमध्ये बोलत होती. यावेळी ती मोकळेपणानं बोलताना दिसली. अंजली म्हणाली की, "जेव्हा मी एका शोमध्ये आलेले, त्यावेळी कुणीतरी माझा डीप फेक एमएमएस बनवून लीक केला होता. ज्याबाबत मला काहीच माहीत नव्हतं. या व्हिडीओनंतर मी खूप ट्रॉमामध्ये होते."
दरम्यान, अंजली अरोराचं हे वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. जरी अंजलीनं खूप आधी वक्तव्य केलेलं असलं. यावेळी अंजलीनं कंगना रानौतबद्दलही बरंच काही सांगितलं. लॉकअप शो कंगना रानौत होस्ट करत होती आणि तिनं अंजलीला अनेक परखड प्रश्न विचारले होते. दरम्यान, अंजली अरोरा लवकरच लग्न करणार आहे आणि बऱ्याच काळापासून ती बऱ्याच काळापासून कुणालातरी डेट करत आहे.
लोक कमेंट्स करतायत
या व्हिडीओवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. एका युजरनं लिहिलं आहे की, "भाई ये कच्चा बादाम क्यों डिफेंड कर रहे हो...", आणखी एका युजरनं लिहिलं, "एआई वाकई में बहुत खतरनाक है...", एका युजरनं लिहिलं की, "हमें GTA 6 से पहले काचा बादाम का बचाव करने वाला बेला फैन पेज मिला...", तर अजून एका युजरनं म्हटलं आहे की, "यही थी एमएमएस में अब झूठ बोल रही है..." लोक अंजली अरोराच्या एमएमएसबाबत अनेक कमेंट्स करत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर अंजली नेहमीच ट्रोल होत असते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :