R. Madhavan Flirting With Young Girls? सध्या सोशल मीडियावर एक स्क्रिनशॉर्ट व्हायरल होत आहे. हा स्क्रिनशॉर्ट अभिनेता आर. माधवन (R. Madhavan) सोशल मीडियावर (Social Media)  तरुणींशी फ्लर्ट करत असल्याचा पुरावा असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, त्याला सोशल मीडियावर पाठवण्यात आलेल्या किस इमोजींना तो प्रतिसाद देत असल्याचाही दावा केला जात आहे. यावरुन सोशल मीडियावर प्रचंड गदारोळ झाला. अशातच आता स्वतः आर. माधवननं पुढे येऊन सत्य बाहेर आणलं आहे, तसेच गैरसमज दूर करत आपली चूकही मान्य केली आहे. दरम्यान, चेन्नईमध्ये 'पॅरेंट जिनी इंक अॅप'च्या लाँचिंग दरम्यान आर. माधवननं सोशल मीडियावर होणाऱ्या अनावश्यक चर्चेबद्दल भाष्य केलं.


आर. माधवननं सोशल मीडियाच्या जगात काम करताना येणाऱ्या समस्यांबद्दल सांगितलं. यासंदर्भातला एक व्हिडीओ रेडिटवर समोर आला आहे, ज्यामध्ये आर. माधवन म्हणत आहे की, "यामुळे जे होतंय, ते हे आहे की, यामुळे आई-वडिलांना लगेचच कळेल की, आपलं मूल सोशल मीडियाचा वापर केव्हा करत आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मी एक अभिनेता आहे. मला इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावर अनेकजण मेसेज करतात. मी तुम्हाला एक थेट उदाहरण देतो. एका छोट्या मुलीनं मला मेसेज केला, "मी ही फिल्म पाहिली, मला खूप आवडली..." 


मुलीकडून स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल 


आर. माधवन पुढे बोलताना म्हणाला की, "ती मला म्हणाली की, "मुझे लगा आप एक शानदार एक्टर हैं, बहुत बढ़िया। आप मुझे प्रेरित करते हैं'..." आणि त्यापुढे तिनं खूप सारे हार्ट आणि किस वाले इमोजी शेअर केले. आता जर एखादा फॅन माझ्याशी अशा पद्धतीनं बोलत असेल, तर मी उत्तर देण्यासाठी बांधील आहे. .. मी तिला रिप्लाय केला की, "मैं हमेशा आपका बहुत-बहुत धन्यवाद कहता हूं और यह आपकी बहुत दयालुता है, भगवान आपका भला करे..." हे माझं तिच्यासाठी उत्तर आहे. यानंतर तिनं माझ्या उत्तराचा स्क्रिनशॉर्ट घेतला आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट केला." 


लोकांनी हे कसं पाहिलं? 


आर. माधवननं पुढे बोलताना म्हटलं की, "आता लोक काय पाहतात? दिल, किस आणि प्रेमाच्या गप्पा... आणि मॅडीनं रिप्लाय केलाय. माझा हेतू तिच्या हार्ट आणि किसच्या इमोजीना उत्तर देणं नव्हतं. माझा हेतू तिच्या मेसेजला उत्तर देण्याचा होता. पण, ही एक छोटीसी गोष्ट आहे. तुम्ही फक्त त्या इमोजी पाहता आणि बोलता. "ओह मॅडी यंग लडकियों से बात कर रहा है..." आता मला हीच भिती वाटायला लागली आहे की, सोशल  मीडियावर मेसेज करताना त्याचा अर्थ कशा पद्धतीनं घेतला जाईल, तुम्ही कल्पना करू शकता की, दुसरं कुणीतरी या गोष्टीला कोणत्या नजरेतून पाहतं..." 


दरम्यान, आर. माधवनचा काही दिवसांपूर्वी बँक घोटाळ्यांवर आधारित 'हिसाब बाराबर' चित्रपट रिलीज झाला. यानंतर त्याचे तमिळ आणि हिंदीमध्ये अनेक चित्रपट आहेत. तमिळमध्ये तो लवकरच 'अधिरतसली' आणि 'टेस्ट' मध्ये दिसणार आहे. हिंदीमध्ये तो 'अमेरिकन पंडित', 'दे दे प्यार दे 2', 'केसरी चॅप्टर 2' आणि 'धुरंधर' मध्ये दिसणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Chhaava Third Sunday Box Office Collection: 'छावा'समोर दिग्गज गळपटले; 2000 कोटींमध्ये बनलेल्या फिल्म्सचे 10 मोठे रेकॉर्ड्स एका झटक्यात मोडले