Oscars 2025 Winner: ऑस्कर 2025 चा भव्य कार्यक्रम अमेरिकेतील (America) लॉस एंजेलिस (Los Angeles) येथे होत आहे. ऑस्कर 2025 म्हणजेच, 97th अकॅडमी अवार्ड्स (97th Academy Awards) लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटर ऑफ ओव्हेशन हॉलिवूडमध्ये सुरू आहे. 2 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात आतापर्यंत अनेक श्रेणींमध्ये पुरस्कार जाहीर झाले आहेत (भारतीय वेळेनुसार, ऑस्कर 2025 ला 3 मार्च रोजी सकाळी 5:30 वाजता). या यादीत बेस्ट एक्टर इन लीडिंग रोल या अवॉर्डचाही समावेश करण्यात आला आहे.
2025 च्या ऑस्करमध्ये एड्रियन ब्रॉडीनं सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आपल्या नावे केला आहे. 'द ब्रुटालिस्ट' या चित्रपटातील त्याच्या दमदार अभिनयासाठी एड्रियन ब्रॉडीला ऑस्कर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. त्यानं इतर चार नामांकितांना हरवून हे विजेतेपद जिंकलं आहे. या लिस्टमध्ये 'द कंप्लीट अननोन' एक्टर टिमथी चाल्मेट, 'सिंग सिंग' अभिनेता कोलमॅन डोमिंगो, 'कॉन्क्लेव' अॅक्टर राल्फ फिएनेस आणि 'द अप्रेंटिस' एक्टर सेबेस्टिन यांचाही समावेश आहे.
कीरन कल्किन बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर
बेस्ट सपोर्टिंग अॅक्टरचा ऑस्कर अवॉर्ड कीरन कल्किननं आपल्या नावे केला आहे. त्यानं फिल्म 'द रियल पेन'मध्ये आपल्या दमदार परफॉर्मेंन्सनं बेस्ट सपोर्टिंग अॅक्टरचा किताब मिळवला आहे. कीरन कल्किननं 'अनोरा' अॅक्टर यूरा बोरिसोव, 'द कम्पलीट अननोन' अॅक्टर अडवर्ड नॉर्टन, 'द ब्रूटलिस्ट' अॅक्टर गाय पीयर्स आणि 'द अप्रेन्टिस' अॅक्टर जेरेमी स्ट्रॉन्गला पछाडलं आहे.
कुठे पाहू शकता ऑस्कर 2025 लाईव्ह?
97th अकॅडमी अवार्ड्स सेरेमनी स्टार मूव्हीज, स्टार मूव्हीज सिलेक्ट आणि जियो स्टारवर लाईव्ह स्ट्रीम होत आहे. एमी विनिंग रायटर, प्रोड्यूसर आणि कॉमेडियन कॉनन ओ'ब्रायन ऑस्कर 2025 चा सोहळा होस्ट करत आहेत. हे मान्यवर पहिल्यांदाच ऑस्कर होस्ट करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :