![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nora Fatehi : नोरा फतेहीला कोरोनाची लागण; सोशल मीडियावरून दिली माहिती
Nora Fatehi Tested Covid Positive : नोरा फतेहीला कोरोनाची लागण झाली आहे.
![Nora Fatehi : नोरा फतेहीला कोरोनाची लागण; सोशल मीडियावरून दिली माहिती nora fatehi tests covid positive share post on social media Nora Fatehi : नोरा फतेहीला कोरोनाची लागण; सोशल मीडियावरून दिली माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/30/35939c22c7369201d6bd463ca9ab67ce_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nora Fatehi Tested Covid Positive : अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीला (Nora Fatehi) कोरोनाची लागण झाली आहे. नुकतीच तिने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना माहिती दिली आहे. नोरा फतेहीच्या प्रवक्त्याने एबीपी न्यूजला माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले, ' 28 डिसेंबरला झालेल्या नोरा फतेहीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह अढळली. नोरा सर्व प्रोटोकॉल्सचे पालन करत आहे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तिने स्वत:ला आयसोलेट केले आहे. '
नोराने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले,'मला कोरोनाची लागण झाली आहे. सर्वांनी काळजी घ्या आणि नियमांचे पालन करा. मास्कचा वापर करा. कोरोना वेगाने पसरत आहे. आरोग्यापेक्षा महत्वाचे काहीच नाही. '
झलक दिखला जा ,बिग बॉस-9, कॉमेडी नाइट्स बचाओ ,डान्स प्लस 4 या शोमधून नोरा प्रेक्षकांच्या भेटीस आली. तिच्या दिलबर दिलबर दिलबर, हाय गरमी या गाण्याला तिच्या चाहत्यांची विशेष पसंती मिळाली. 'रोअर: टायगर्स ऑफ सुंदरबन' या चित्रपटातून नोराने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
नोराची सोशल मीडिया पोस्ट
View this post on Instagram
संबंधित बातम्या
Viral Video : भाईजान झाला 'रिक्षावाला', Salman Khan ने पनवेलमध्ये चालवली ऑटो रिक्षा
Pushpa: The Rise : Allu Arjun च्या 'पुष्पा' सिनेमाच्या यशाने दिग्दर्शक भारावला, प्रत्येक क्रू मेंबरला देणार 1 लाखांचे बक्षीस
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)