एक्स्प्लोर

कॉपीराईट प्रकरणी हायकोर्टाचा 'बादशाहो'ला दिलासा नाही

'कह दू तुम्हे, या चूप रहू, दिल में मेरे आज क्या है' या गाण्याच्या संगीत आणि गीताच्या कॉपीराईट्सवरुन दीवारच्या निर्मात्यांनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले होते.

मुंबई : अजय देवगन, इम्रान हाश्मीची मुख्य भूमिका असलेल्या 'बादशाहो' चित्रपटाला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. 'दीवार'मधलं गाणं वापरायचं असेल, तर 'बादशाहो' रीलिज करता येणार नाही, असं अल्टिमेटम मुंबई हायकोर्टाने चित्रपट निर्मात्यांना दिलं आहे. वर्टेक्स मोशन पिक्चर्स आणि टी सीरिजने सिनेमाची निर्मिती केली आहे. 1975 साली प्रदर्शित झालेल्या 'दीवार' चित्रपटातील 'कह दू तुम्हे' गाणं 'बादशाहो'त वापरल्यामुळे दीवारच्या निर्मात्यांनी कोर्टात धाव घेतली होती. 'कह दू तुम्हे' गाणं वापरल्यास 'बादशाहो' चित्रपटाचं प्रदर्शन रोखण्याचे आदेश गेल्या आठवड्यात खंडपीठाने दिले होते. त्याविरोधात बादशाहोच्या निर्मात्यांनी केलेली याचिकाही हायकोर्टाने फेटाळून लावली. 'कह दू तुम्हे, या चूप रहू, दिल में मेरे आज क्या है' या गाण्याच्या संगीत आणि गीताच्या कॉपीराईट्सवरुन दीवारच्या निर्मात्यांनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गाणं साहिर लुधियानवी यांनी लिहिलं होतं. आरडी बर्मन यांचं संगीत या गाण्याला लाभलं आहे. अमिताभ बच्चन, शशी कपूर यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. 'बादशाहो' चित्रपटाच्या निर्मात्यांनी कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन केल्याचा दावा 'दीवार'चे निर्माते त्रिमूर्ती फिल्म्स यांनी 22 ऑगस्ट रोजी केला होता. 'कह दू तुम्हे' गाणं वापरल्यास 'बादशाहो' चित्रपटाचं प्रदर्शन थांबवा, मात्र ते गाणं वगळल्यास रिलीजला कोणतीही आडकाठी नसल्याचं जस्टिस के आर श्रीराम यांनी स्पष्ट केलं होतं. अजय देवगन, इम्रान हाश्मी, इशा गुप्ता, एलियाना डिक्रुझ, विद्युत जमवाल, संजय मिश्रा यांच्या बादशाहोमध्ये मुख्य भूमिका आहेत. वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई, द डर्टी पिक्चर, कच्चे धागे सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक मिलन लुथरिया यांच्या खाद्यावर 'बादशाहो'ची जबाबदारी आहे. 1 सप्टेंबर 2017 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक

ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 

भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडाRajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाडZero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण

माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार

'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा

Embed widget