एक्स्प्लोर

Nitin Desai Suicide: नितीन देसाईंच्या आत्महत्येबाबत सभागृहात चर्चा; स्टुडिओ ताब्यात घेण्यासाठी देसाईंवर जबरदस्ती केली का? याचा तपास करणार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

नितीन देसाईंच्या (Nitin Desai Suicide) आत्महत्येबाबत सभागृहात चर्चा झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की, 'नितीन देसाई यांच्यावर दबाव केला गेला होता का? त्यांच्यावर जोर जबरदस्ती केली गेली का? या सगळ्या गोष्टींची चौकशी सरकार करेल.'

Nitin Desai Suicide:  कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai Suicide) यांनी आत्महत्या केली आहे.  नितीन देसाई (ND Studio) यांनी एन.डी. स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. नितीन देसाईंच्या आत्महत्येबाबत सभागृहात चर्चा झाली. यावेळी  देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की, 'नितीन देसाई यांच्यावर दबाव केला गेला होता का? त्यांच्यावर जोर जबरदस्ती केली गेली का? या सगळ्या गोष्टींची चौकशी सरकार करेल.'

आशिष शेलार यांनी  सभागृहातील सांगितलं , 'नितीन देसाई यांनी 186 कोटी रुपये कर्ज काढले होते. 186 कोटीचे 252 कोटी कर्ज झाले. एक कन्स्ट्रक्शन कंपनीचा मालक आहे. त्याची कर्ज देणारी कंपनी आहे. आधुनिक सावकारी आहे. व्याजावर व्यज लावण्याचा प्रकार आहे. चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येला न्याय द्या.'

अशोक चव्हाण म्हणाले,  'ज्यांनी कर्तुत्वाने आपलं काम उभ केलं. त्यांनी चांगला स्टुडिओ उभारला. त्यांच्या ऑडिओ क्लिप समोर आल्या आहेत. त्यांच्यावर कर्ज होतं आणि त्यांच्या मागे माणसे लागली होती त्यामुळं त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे, असं म्हटलं जात आहे. त्याची चौकशी केली पाहिजे. तो स्टुडिओ शासनाने आपल्याकडे घ्यावा.'

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ' नितीन देसाई यांनी काल आत्महत्या केली आहे. मराठी माणसाला अभिमान वाटावा असं काम त्यांनी केलं होतं. अनेक राजकीय पक्षाचे काम देखील ते करत होते. दिल्लीतील चित्ररथ देखील तेच करत होते. पंतप्रधान यांनी वाराणसीला जे घाट केले त्यामध्ये देखील देसाई यांनी काम होतं .त्यांच्यावर कर्ज झालं होतं. स्टुडिओवर कर्ज होतं. त्यांचा स्टुडिओवर कब्जा करण्यासाठी काही वेगळे प्रयत्न केले गेले आहेत का? त्यांच्यावर काही दबाव केला गेला होता का? त्यांच्यावर स्टुडिओ ताब्यात घेण्यासाठी जोर जबरदस्ती केली गेली का? नियामाच्या बाहेर जाऊ त्यांच्यावर इंट्रेस लाऊन त्यांना फसवण्याचा प्रयत्न करण्यात आला का? या सगळ्या गोष्टींची चौकशी सरकार करेल. एका मराठी माणसानं तयार केलेला स्टुडिओ तो आहे. त्या स्टुडिओच्या कायदेशीर बाबी तपासून हा स्टुडिओ  सरकारला टेक ओव्हर करता येईल का? याबाबत प्रयत्न केला जाईल.'

2005 मध्ये नितीन देसाई यांनी एन.डी.स्टुडिओची स्थापना केली. नितीन देसाई यांनी अनेक सुपरहिट हिंदी सिनेमांचे सेट उभारले होते.'1942 अ लव्ह स्टोरी', 'हम दिल दे चुके सनम', 'माचिस', 'देवदास', 'लगान', 'जोधा अकबर' या सुपरहिट सिनेमाचं त्यांनी कला दिग्दर्शन केलं होतं. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Nitin Desai Suicide: 'तो लढवय्या होता...'; नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर सुबोध भावेनं व्यक्त केल्या भावना

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget