एक्स्प्लोर

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि संजय राऊत 'माझा' कट्ट्यावर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत 'ठाकरे' हा सिनेमा येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. यानिमित्ताने सिनेमात बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारलेला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि निर्माते खासदार संजय राऊत यांनी सिनेमाचा प्रवास 'माझा' कट्ट्यावर सांगितला.

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत 'ठाकरे' हा सिनेमा  येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. यानिमित्ताने सिनेमात बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारलेला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि निर्माते खासदार संजय राऊत यांनी सिनेमाचा प्रवास 'माझा' कट्ट्यावर सांगितला. "बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर आधारीत सिनेमात त्यांची भूमिका करण्यासाठी राऊतांनी सांगितल्यावर सुरवातीला विश्वास बसला नव्हता. एखाद्या अभिनेत्याला जितकी आव्हानात्मक भूमिका मिळेल तितका त्याला आनंद होत असतो. त्यामुळे सिनेमात बाळासाहेबांची भूमिका आपल्याला मिळाली याचा मला अतिशय आनंद झाला. बाळासाहेबांची भूमिका साकारणे अत्यंत कठिण होते. बाळासाहेबांना प्रत्यक्ष कधी भेटलो नाही परंतू त्यांचे भाषण, टिव्हीवरील मुलाखती पाहिल्या आहेत", असे नवाजुद्दीन सिद्दीकीने यावेळी सांगितले. "बाळासाहेब ठाकरेंची भूमिका करतोय हे समजल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. काही जणांनी या भूमिकेबद्दल कौतुक केलं तर काहींनी हे का करतोय? वगैरे असे प्रश्नही विचारले.  परंतू इतकी मोठी भूमिका मिळाल्यानंतर कोण काय म्हणतं याकडे माझे लक्ष नव्हते", असे नवाजुद्दीन म्हणाला. 'ठाकरे' सिनेमाचे निर्माते खासदार संजय राऊत यांनी देखील सिनेमाच्या निर्मितीचा प्रवास यावेळी सांगितला. " हा सिनेमा करताना त्यामध्ये बाळासाहेबांची नक्कल करायची नाही असे सुरवातीलाच ठरवले होते. बाळासाहेबांचं आयुष्य, त्यांचा संघर्ष लोकांसमोर मांडायचा होता. एखाद्या हॉलीवुड किंवा बॉलीवुड सिनेमाला पडद्यावर जो 'मसाला' लागतो तो सगळा बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यात होता. त्यामुळे सिनेमात वेगळं काही समाविष्ट करण्याची गरज पडली नाही",  असे राऊत म्हणाले. तसेच हा सिनेमा फक्त बाळासाहेबांवर केंद्रीत असला पाहिजे हे सुरवातीपासूनच ठरवले होते. बाळासाहेबांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेक लोक येऊन गेले. परंतू इतर कोणावरही लक्ष न देता फक्त बाळासाहेबांवर हा सिनेमा बनवलेला असल्याचे राऊत यांनी सांगितले. व्हिडीओ :

महत्त्वाच्या बातम्या

Aamir Khan Marries Gauri Spratt: आमिर अन् गौरीची साता जन्माची गाठ! घरच्या घरीच अभिनेता तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत; पहिला PHOTO व्हायरल
आमिर अन् गौरीची साता जन्माची गाठ! घरच्या घरीच अभिनेता तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत; पहिला PHOTO व्हायरल
Rupali Chakankar on Maharashtra Epstein Files: 'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स'च्या टीमला रुपाली चाकणकरांचा दणका; निर्माते, दिग्दर्शक अन् दिपाली सय्यद यांच्याविरोधात नोटीस
'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स'च्या टीमला रुपाली चाकणकरांचा दणका; निर्माते, दिग्दर्शक अन् दिपाली सय्यद यांच्याविरोधात नोटीस
Aamir khan gauri spratt wedding: आमिर खानच्या लग्नात पाहुण्यांची लगबग; मनसेप्रमुख राज ठाकरेही पोहोचले, आणखी कोण हजेरी लावणार?
आमिर खानच्या लग्नात पाहुण्यांची लगबग; मनसेप्रमुख राज ठाकरेही पोहोचले, आणखी कोण हजेरी लावणार?
Pandavani Singer Dr. Teejan Bai: पद्मविभूषण डॉ. तीजन बाई यांचे निधन; वयाच्या 70 व्या वर्षी एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
पद्मविभूषण डॉ. तीजन बाई यांचे निधन; वयाच्या 70 व्या वर्षी एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

व्हिडीओ

Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi Rain : भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
Nashik Crime News: कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
Nitesh Rane: 'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे सचिन अहिर आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' नितेश राणेंचं खोचक उत्तर
'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे सचिन अहिर आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' नितेश राणेंचं खोचक उत्तर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
कोल्हापुरात पावसाचा जोर कायम, गगनबावड्यात धुवाँधार, जिल्ह्यातील 31 बंधारे पाण्याखाली; सांगलीतही कोसळधारा, चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी, अलमट्टी अजूनही तळाला
कोल्हापुरात पावसाचा जोर कायम, गगनबावड्यात धुवाँधार, जिल्ह्यातील 31 बंधारे पाण्याखाली; सांगलीतही कोसळधारा, चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी, अलमट्टी अजूनही तळाला
Dhiraj Lingade: शिंदे गटाकडून काँग्रेस आमदाराला पक्षांतरासाठी 20 कोटींची ऑफर? संजय राऊतांच्या खळबळजनक दाव्यावर धीरज लिंगाडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिंदे गटाकडून काँग्रेस आमदाराला पक्षांतरासाठी 20 कोटींची ऑफर? संजय राऊतांच्या खळबळजनक दाव्यावर धीरज लिंगाडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Sachin Ahir : सुषमा अंधारे, बाबाजी काळेही तुमच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेत येणार का? सचिन अहिरांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
सुषमा अंधारे, बाबाजी काळेही तुमच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेत येणार का? सचिन अहिरांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Embed widget