Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan : 100 व्या ऐतिहासिक अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची (100th Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan) नाट्यकर्मी आतुरतेने वाट पाहत आहेत. कोरोनामुळे रखडलेल्या शतकमहोत्सवी नाट्य संमेलनाचं बिगुल अखेर वाजलं आहे. 5 जानेवारीपासून नांदीला सुरुवात होणार असून महाराष्ट्रभर शतक महोत्सवी नाट्य संमेलन पार पडणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad) यासंदर्भात घोषणा केली आहे. 


अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे 100 वे  अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन


अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य नियोजित संमेलनाध्यक्ष  डॉ. जब्ब्बर पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून या संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार व मुख्य निमंत्रक उदय सामंत आहेत. तंजावर येथे 99 व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. प्रेमानंद गज्वी व नाट्य परिषदेचे पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत नाट्य संहिता पूजन व नटराज पूजन होणार आहे.  यानंतर नाट्य संमेलनाच्या सोहळ्याची मुहूर्तमेढ कार्यक्रम सांगली येथे दिनांक 29 डिसेंबर 2023  रोजी होणार आहे. 


शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी पुणे येथे सुरु होऊन समारोप मे 2024 मध्ये रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे. उद्घाटन सोहळा ते समारोप या कालावधीत अहमदनगर, सोलापूर, बीड, लातूर, नागपूर आणि मुंबई येथे विभागीय नाट्य संमेलन संपन्न होणार आहे. 


नाट्यसंमेलन कसं असेल? (Natya Sammelan Schedule)



  • 5 जानेवारी 2024 - पुण्यात शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा शुभारंभ

  • 6 जानेवारी 2024 - पिंपरी-चिंचवड येथे नाट्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार

  • 7 जानेवारी 2024 - विविध कार्यक्रमांचे आयोजन (महाराष्ट्रातील विविध शाखा व कलावंत सहभागी होणार)


महाराष्ट्रातील विविध ठिकाणी संमेलनाचे आयोजन



100 व्या  नाट्य संमेलनानिमित्त विशेष उपक्रम म्हणून आणि जास्तीत जास्त कलावंतांना आपली कला सादर करण्याची संधी  मिळावी, यासाठी नाट्य कलेचा जागर आयोजित करण्यात आला असून यात खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा (महोत्सव), बालनाट्य स्पर्धा (महोत्सव), नाट्य संगीत स्पर्धा (महोत्सव), एकपात्री स्पर्धा (महोत्सव), नाट्यछटा स्पर्धा (महोत्सव) आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी महाराष्ट्रातील विविध 22 केंद्रांवर जानेवारी 2024 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत होणार असून निवडक एकांकिका, बालनाट्य, नाट्य संगीत, एकपात्री, नाट्यछटा उपांत्य फेरी नाशिक आणि सांगली येथे मार्च 2024 रोजी संपन्न होणार आहे. 


उपांत्य फेरीतून निवडण्यात आलेल्या 9 एकांकिका आणि  बालनाट्य तसेच नाट्य संगीत, एकपात्री, नाट्यछटा यांची अंतिम फेरी एप्रिल 2024 यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा , मुंबई येथे संपन्न होणार आहे. या संपूर्ण 100 व्या नाट्य संमेलनास रसिक आणि रंगकर्मींनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी केले आहे.


संबंधित बातम्या


Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा शंभराव्या नाट्यसंमेलनाला फटका, आंदोलनामुळे सुधीर गाडगीळांचा राजीनामा; मुहूर्तमेढ लांबणीवर