Munjya Box Office Collection Day 2: आदित्य सरपोतदार (Aditya Sarpotdar) दिग्दर्शित 'मुंज्या' (Munjya) हा सिनेमा सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेते मनोहर जोशी यांची शर्वरी वाघ ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचप्रमाणे बॉलीवूड सिनेमा असूनही यामध्ये अनेक मराठी कलाकार हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. दरम्यान या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी दमदार सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं.
ओपनिंग डेलाच या सिनेमा जवळपास 4.21 कोटी रुपयांची कमाई केली असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. sacnilk.com च्या मते, मुंज्याने शुक्रवारी एकूण 21.49 टक्के हिंदी सिनेमाचा व्यवसाय व्यापला. दरम्यान दुसऱ्या दिवशीही शनिवारी संध्याकाळी 7:15 पर्यंत मुंज्याचे कलेक्शन 4.44 कोटींवर पोहोचले आहे. त्यामुळे या चित्रपटाने आतापर्यंत एकूण 8.44 कोटींचा व्यवसाय केला आहे. सकाळपर्यंत या आकडेवारीत बदल होऊ शकतात. या सिनेमाची घोडदौड अशीच सुरु राहिली तर पुढच्या वीकेंडला चित्रपट बजेटपर्यंत पोहोचेल.
मुंज्याचे बजेट किती?
मुंज्याच्या बजेटबद्दल बोलायचं तर हा चित्रपट 30 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदारने केलं आहे. आदित्यने सांगितले होते की, या चित्रपटाच्या व्हीएफएक्सवर 50 टक्के बजेट खर्च करण्यात आले आहे. आम्ही तुम्हाला सांगूया की हा भारतातील पहिला CGI (कॉम्प्युटर जनरेटेड इमेजरी) चित्रपट आहे. या सिनेमात कलाकारांची संख्या फार नाही. त्यामुळे निर्मात्यांनी या सिनेमाच्या कथेवर आणि इतर गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे लोकांना हा चित्रपट आवडला आहे.
वीकेंडकडे साऱ्यांचं लक्ष
दरम्यान जर पहिल्या वीकेंडला या सिनेमाची पहिली कमाई चांगली झाली तर पुढच्या वीकेंडपर्यंत हा सिनेमा चांगली कमाई करण्याची शक्यता आहे. याशिवाय कार्तिक आर्यनचा चंदू चॅम्पियन हा चित्रपट येत्या आठवड्यात प्रदर्शित होत आहे.चाहत्यांनाही या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात मुंज्याला चंदू चॅम्पियनशी सामना करावा लागणार आहे. व्यवसाय असाच सुरू राहिला तर शर्वरी वाघच्या हिट चित्रपटांमध्ये मुंज्याचा समावेश होऊ शकतो.
मुंज्याची गोष्ट नेमकी काय?
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित हा सिनेमा विशेषकरुन कोकणाती मुंज्या या भूतावर आधारित आहे. असं म्हटलं जातं की, जर एखाद्या मुलाचा मृत्यू त्याची मुंज झाल्यानंतर 10 दिवसांत झाला तर त्याची राख राख झाडाखाली पुरली जाते. अन्यथा तो ब्रह्मराक्षस बनतो आणि त्याचा आत्मा येणाऱ्या पिढ्यांना दिसतो.