Chunky Panday Aditya Roy Kapur Vacation: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) गेल्या काही दिवसांपासून तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. आदित्य रॉय कपूर (Aditya Roy kapur) आणि तिचं नातं संपलं असल्याचंही म्हटलं जात आहे. पण अद्याप यावर या दोघांनीही कोणतंही भाष्य केलेलं नाही. इतकच नव्हे तर त्यांच्या अफेअरवरही या दोघांनाही कुठलंही भाष्य केलेलं नव्हतं. पण याच दरम्यान अनन्याचे वडील चंकी पांडे (Chunky Panday) आणि आदित्य हे दोघे गोव्यात मज्जा करताना दिसले. 


गोव्यात आदित्य रॉय कपूरसोबत चंकी पांडे


चंकी पांडे यांनी आदित्य सोबतचे गोव्यातले काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये चंकी आणि आदित्य हे दोघे गोव्याच्या बीचवर मज्जा करताना दिसत आहे. हे फोटोला कॅप्शन देत चंकी पांडे यांनी म्हटलं की, 'Meet Sir Carlito Breganza from Goa.' इतकंच नव्हे तर या फोटोमध्ये चंकी पांडे यांचा नवा लूकही दिसत आहे.  






चंकी पांडे यांच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स


चंकी पांडे यांनी त्यांच्या फोटोंसोबत आदित्यसोबतचा सेल्फी देखील शेअर केला आहे. माहितीनुसार, हे दोघेही या बीचवर एका जाहिरातीचं शुटींग करत होते. पण त्यांचा हा अंदाज चाहत्यांना देखील पसंत आला आहे. यावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका कमेंट करत म्हटलं की, जावाई आणि सासरे दोघेही मस्त दिसायत.  


2022 पासून अनन्या-आदित्यच्या डेटींगच्या चर्चा


अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरच्या यांच्या नात्याविषयी 2022 पासून चर्चा सुरु आहे. हे दोघेही क्रिती सेनॉनच्या दिवाळी पार्टीत एकत्र दिसले होते. यानंतर, त्यांच्या रोमँटिक व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि ते फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले होते. इतकचं नव्हे तर अनन्याच्या बहिणीच्या डोहाळजेवणाला देखील आदित्य हजर होता. पण मागील काही दिवसांमध्ये अनन्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे या दोघांच्याही ब्रेकअपच्या चर्चांना आता उधाण आलंय. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अनन्या पांडे शेवटची 'खो गये हम कहाँ' मध्ये दिसली होती. आदित्य रॉय लवकरच 'मेट्रो इन दिनों में' मध्ये दिसणार आहे.


ही बातमी वाचा : 


Mukesh Khanna : अयोध्येत भाजपचा पराभव, मुकेश खन्ना म्हणाले, 'भव्य मंदिरासोबतच लोकांचाही विचार...'; पण नेटकऱ्यांनीही चांगलच सुनावलं