Munjya Box Office : मराठी दिग्दर्शकानं बॉक्स ऑफिस गाजवलं, मुंज्याने 16 दिवसांत पार केला 80 कोटींचा टप्पा; लवकरच करणार 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री
Munjya Box Office : बॉलीवूडमध्ये मुंज्या या सिनेमाने बॉक्स ऑफिस गाजवलं असून अवघ्या 16 दिवसांत या सिनेमाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.
Munjya Box Office : बॉलीवूडच्या शर्यतीत आदित्य सरपोतदारचा (Aditya Sarpotdar) 'मुंज्या' (Munjya) हा सिनेमा वरचढ ठरला असून आता लवकरच हा सिनेमा 100 कोटींच्या घरात प्रवेश करणार आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे हा सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. अवघ्या चारच दिवसांत या सिनेमानं त्याचं बजेट कव्हर केलं. समोर कार्तिक आर्यनच्या चंदू चॅम्पिअनसमोर मुंज्याने यशस्वी घोडदौड केली. अजूनही या सिनेमाचा यशस्वी प्रवास सुरु आहे.
मुंज्या 16 दिवसांतच 80 कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे सध्या बॉक्स ऑफिसवरचा हा सिनेमा लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करेल. मोठी स्टारकास्ट नाही, बिग बजेट नाही, तरीही मुंज्याने इतक्या कोटींचा टप्पा कसा पूर्ण करु शकला याविषयी दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. त्यावर त्याने म्हटलं होतं की, आम्ही मुंज्याचं शेवटच्या दोन आठवड्यात प्रोमोशन करण्यास सुरुवात केली. कारण सुरुवातीपासून केल्यास लोकं नंतर ते विसरतात. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात केला जे लोकांच्या लक्षात राहिलं आणि ते लोकांपर्यंत पोहचलं.
मुंज्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
मुंज्याने सिनेमाने प्रदर्शनाच्या तिसऱ्या शनिवारीही 5.80 कोटी रुपयंची कमाई केली. तसेच आतापर्यंत मुंज्याने 16 दिवसांत एकूण 80.11 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे या सिनेमासाठी 100 कोटींच्य क्लबची दारं कधीच उघडली गेलीत. आता हा सिनेमा कधीपर्यंत 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करतो याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.
View this post on Instagram
मुंज्या मराठीत का केला नाही?
मुंज्या मराठीत का केला नाही यावर बोलताना आदित्यने म्हटलं की, मला नेहमी वाटतं की ही गोष्ट मराठीत झाली असती, पण मला मोठा प्रेक्षक वर्ग मिळाला नसता. मी उदाहरण दिलंच, कांतारा त्यांनी त्यांच्या भाषेत करुन त्याला मास रिलीज केलं, मी मुंज्या मराठीत करुन ते करु शकलो असतो. पण आजही जेव्हा एखादा मराठी सिनेमा आपण मास रिलीज करायला जातो, तेव्हा आजही त्याला मर्यादा आहेत. त्याला बरीच कारण देखील आहेत.