Munjya Box Office Collection Day 13 : आदित्य सरपोतदार (Aditya Sarpotdar) दिग्दर्शित, शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांचा 'मुंज्या' (Munjya Movie) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा हॉरर कॉमेडी चित्रपट रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई करत आहे. रिलीजच्या 6 दिवसांतच या चित्रपटाने आपले बजेट वसूल केले.  चित्रपटाने रिलीजच्या 13व्या दिवशीदेखील चांगली कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'ची क्रेझ कायम असल्याचे दिसते.

  


'मुंज्या'ने रिलीजच्या 13 व्या दिवशी किती केली कमाई?


आदित्य सरपोतदार दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचा हिट चित्रपटांचा दुष्काळ संपवला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. 'मुंज्या'ची दमदार कथा, कलाकारांचा सहजसुंदर अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.  त्यामुळेच या चित्रपटाच्या कमाईतही वाढ होत आहे. 


'मुंज्या'ने पहिल्याच दिवशी  4 कोटींची कमाई केली होती. पहिल्या आठवड्यात 'मुंज्या'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन 35.3 कोटी रुपये होते. आता या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातील शुक्रवारी 3.5 कोटी रुपये,  शनिवारी 6.5 कोटी, रविवारी 8.5 कोटी, सोमवारी 5.25 कोटी रुपये आणि दुसऱ्या मंगळवारी 3.4 कोटींची कमाई केली आहे. 


Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'मुंज्या' ने रिलीजच्या 13व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या बुधवारी 2.85 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह 'मुंज्या'चे 13 दिवसांचे एकूण कलेक्शन आता 65.30 कोटी रुपये झाले आहे.


'मुंज्या' 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणार?






'मुंज्या'ने आता आपल्या बजेटच्या दुप्पट कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची जादू कायम आहे. आता 'मुंज्या' 100 कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या क्लबमध्ये प्रवेश करणार का याकडे सिनेवर्तुळाचे लक्ष लागले आहे.  


 'मुंज्या'च्या आधी बॉक्स ऑफिसवर मोठ्या स्टारचे चित्रपट आले होते. पण,त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर कोणतीही मोठी स्टारकास्ट नसताना 'मुंज्या'ने बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिली आहे. 


इतर संबंधित बातमी :