Munjya Movie  मागील काही महिन्यात बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांना दमदार कामगिरी करण्यास अपयश आले. तर, दुसरीकडे मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदारचे (Aditya Sarpotdar) दिग्दर्शन असलेल्या 'मुंज्या' या चित्रपटाने या वीकेंडला चांगली कामगिरी केली आहे. तीन दिवसात जवळपास 20 कोटींचा गल्ला 'मुंज्या'ने जमवला आहे. जवळपास 30 कोटींमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कशी कमाई केली, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. फारसं प्रमोशन नाही, की मोठे तगडे कलाकारदेखील नाही तरी देखील 'मुंज्या'ने चांगली कमाई केली आहे. काही ट्रेड तज्ज्ञांनुसार या चित्रपटाच्या यशामागे काही महत्त्वाची कारणे आहेत.


कथा आणि व्हीएफएक्स... 


चित्रपटात फार बडा स्टार कलाकार नाही. मात्र, चित्रपटाची गोष्ट चांगली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी सरासरी कलेक्शन होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी चित्रपटाच्या कमाईत 80 टक्क्यांनी वाढ झाली. चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये माऊथ पब्लिसिटी दिसून येत होती. आदिपुरुश सारखा मोठा चित्रपटही व्हीएफएक्समुळे  ट्रोल झाला होता. मात्र, 'मुंज्या'च्या टीमने या चुका टाळल्या. व्हीएफएक्सवर कोणतीही तडजोड केली नाही. एका मुलाखतीत दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने म्हटले होते की, चित्रपटाचे निम्मे बजेट हे व्हीएफएक्स आणि तांत्रिक बाबींवर खर्च करण्यात आले. 


ही गोष्ट पडली पथ्यावर... 


बॉक्स ऑफिसवर सध्या एकही मोठा चित्रपट रिलीज झाला नाही. त्याचा फायदा 'मुंज्या'ला झाला. त्याशिवाय हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट असल्याने त्याला लहानांपासून ते मोठ्या व्यक्तींकडून पसंतीची पावती मिळत आहे. हा एक कौटुंबिक मनोरंजन चित्रपट असल्याने लोकांची पसंती मिळत आहे. सध्या 'चंदू चॅम्पियन' रिलीज होईपर्यंत या चित्रपटाला कमाईची पूर्ण संधी आहे. त्यानंतर चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन कमी होण्याची संधी आहे. 


कलाकारांचा दमदार परफॉर्मन्स...


चित्रपटात कोणताही मोठा स्टार कलाकार नाही. शर्वरी वाघ, सत्यराज, मोना सिंह, अभय  वर्मा, सुहास जोशी आदी कलाकार आहेत. हे कलाकार बडे सेलिब्रिटी नसले तरी दमदार  कलाकार म्हणून त्यांची ओळख आहे. या सगळ्या कलाकारांनी आपला चांगला परफॉर्मेन्स देण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाची कथा चांगली आहे, पण  कलाकारांचा अभिनयदेखील तोडीचा आहे. 


चित्रपट प्रमोशनमध्ये वाचवले पैसै...


चित्रपट निर्मात्यांनी प्रमोशनमध्ये फारसे पैसे खर्च केले नाहीत. हाच पैसा त्यांनी इतर आवश्यक ठिकाणी खर्च केला. कमी बजेटमध्ये एक चांगला चित्रपट तयार करण्यास निर्माते-दिग्दर्शक यशस्वी ठरले. रिलीजच्या दुसऱ्याच दिवशी हा चित्रपट माऊथ पब्लिसिटीवर चालणार असल्याचे स्पष्ट झाले. 


'भेडिया' युनिव्हर्सचा हिस्सा...


या चित्रपटाच्या पोस्ट क्रेडिट सीन्समध्ये वरुण धवन आणि अभिषेक बॅनर्जी दिसले आहेत. त्यामुळे या चित्रपटाची कथा आता इतर चित्रपटाच्या कथेशी कनेक्ट असू शकते. त्यामुळे आता भेडिया अथवा 'मुंज्या' चित्रपटाचा पुढे कोणता भाग आला तर तो चित्रपट समजण्यास अडचण येऊ नये यासाठी देखील अनेकजण 'मुंज्या' पाहण्यास जात आहे. ''मुंज्या'' हा 'भेडिया' युनिव्हर्सचा एक भाग असल्याच्या चर्चेचा फायदा मिळत आहे.