Shahrukh Khan Old Clip: : एनसीबीने (NCB) काल रात्री क्रुझवर सुरू असलेल्या ड्रग्स पार्टीवर छापा टाकत मोठी कारवाई केली. त्या क्रुझ पार्टीत बॉलिवूडच्या सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा होता. एनसीबीकडून त्याची चौकशी सुरु असतानाच आता शाहरूख खानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. शाहरूख खानचा एका जुन्या मुलाखती दरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसून येत आहे. 


सोशल मीडियावर व्हायरल होणारा शाहरुखचा हा व्हिडीओ म्हणजे सिमी ग्रेवाल शाहरूखची घेतलेली एक जुनी मुलाखत आहे. त्यात ती शाहरूखला प्रश्न विचारते की, आर्यनचे पालन-पोषण तुम्ही कसे करता? यावर शाहरूख म्हणतो, मी माझ्या तरुणपणात न केलेली कामे आर्यनने करावीत. माझ्या तरुणपणात माझी इच्छा असूनदेखील मला तशा सुविधा न मिळाल्याने मी ती कामे करू शकलो नाही. पण आर्यन ने करावीत. माझा मुलगा ड्रग्ज, डेट, सेक्स करू शकतो असे वक्तव्य शाहरुख खानने केलेले आहे. 


सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ 1997 सालातला आहे. आता प्रिया कुलकर्णी यांनी ट्वीटरवर व्हिडीओ शेअर केला आहे. या खेळीमेळीच्या मुलाखतीत आर्यन हा शाहरूख आणि गौरीच्या किती जवळचा आहे ते
कळते. तसेच आर्यनच्या भविष्यावर देखील तो बोलला आहे. हे जवळजवळ 27 मिनिटांचे संभाषण आहे. 


काल रात्री क्रुझवर केलेल्या कारवाईत 30 ग्रॅम चरस, 20 ग्रॅम कोकेन, 20 ग्रॅम टॅबलेट्स, 10 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आलं आहे.  आता शाहरूखच्या मुलाला अटक होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच शाहरूखने केलेल्या वक्तव्यानुसार आता शाहरूखदेखील अडचणीत येऊ शकतो.   क्रूझ पार्टी प्रकरणी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानची चौकशी सुरू आहे. त्याला एनसीबीनं ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. क्रूझवर ड्रग्ज पार्टी सुरू असताना आर्यन क्रुझवर उपस्थित होता.  त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. आर्यन समवेत त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा, नुपुर सारिका, इश्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकर, गोमित चोप्रा यांचीही चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. 


आठ तासांहून अधिक वेळ कारवाई
ही कारवाई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या टीमकडून करण्यात आली. आठ तासांहून अधिक वेळ क्रुझवर कारवाई सुरु होती. सूत्रांनी सांगितलं की, ही क्रुझ मुंबईवरुन गोव्याला चालली होती. जशी ही क्रुझ मुंबईवरुन निघाली तशी ड्रग्ज पार्टी सुरु झाली. एनसीबीची टीम आधीपासूनच क्रुझवर होती. मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मिळाल्यानंतर क्रुझ मुंबईकडे वळवण्यात आली. या छाप्यामध्ये बड्या अभिनेत्यांच्या मुलांची नाव समोर येत असल्यानं छाप्यादरम्यान सर्व एनसीबीच्या टीमच्या कर्मचाऱ्यांचे फोन बंद करण्यात आले. छापेमारीची कारवाई पूर्ण होईपर्यंत त्यांचे फोन बंद होते.  


Cruise Party : क्रूझ पार्टी प्रकरणी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान NCBच्या ताब्यात, चौकशी सुरू