Mumbai NCB Raid LIVE Update:  मुंबईतील ड्रग्ज रॅकेट्स (drugs case) काही कमी होण्याचं नाव घेत नाहीय. एनसीबीनं (NCB) काल रात्री एका क्रुझवर सुरु असलेल्या ड्रग्ज पार्टीवर छापा मारला. या प्रकरणी आठ लोकांना अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणी मोठी अपडेट आली असून क्रूझ पार्टी प्रकरणी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानची चौकशी सुरू आहे. त्याला एनसीबीनं ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. क्रूझवर ड्रग्ज पार्टी सुरू असताना आर्यन क्रुझवर उपस्थित होता.  त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. आर्यन समवेत त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा, नुपुर सारिका, इश्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकर, गोमित चोप्रा यांचीही चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. 


Mumbai NCB Raid: मोठं अपडेट! क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी आठ जणांना एनसीबीकडून अटक


काल रात्री या क्रुझवर केलेल्या  कारवाईत 30 ग्रॅम चरस, 20 ग्रॅम कोकेन, 20 ग्रॅम टॅबलेट्स, 10 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आलं आहे. या प्रकरणी दहा जणांना ताब्यात घेऊन त्यांची दहा तास चौकशी करण्यात आली. या दोन महिलांचा समावेश आहे. तर एका बड्या अभिनेत्याचा मुलगा यात सहभागी असल्याची माहिती आहे. या प्रकरणात आठ लोकांना अटक केली आहे. 


NCB Raid LIVE UPDATES : क्रूझवर NCBची मोठी कारवाई, बड्या अभिनेत्याचा मुलगा सहभागी, पाहा घटनेचे प्रत्येक अपडेट्स


काल रात्री एका क्रुझवर छापा मारत बॉलिवूडमधील एका बड्या अभिनेत्याच्या मुलासह दहा लोकांना ताब्यात घेतलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार क्रूझ टर्मिनलवरुन एक क्रूझ लक्ष्यद्वीपकडे जाणार होती. ज्यात एनसीबी अधिकाऱ्यांकडून छापा टाकण्यात आला. यात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज हाती लागले असल्याची माहिती आहे. या क्रूझवर एक रेव्ह पार्टी होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. दरम्यान एनसीबी अधिकारी समीर वानखेडे काही जणांना घेऊन एनसीबी कार्यालयात दाखल झाले असल्याची माहिती आहे.


NCB Raid : कारवाईनंतर 'त्या' अभिनेत्याच्या मुलगा म्हणाला, 'मला व्हिआयपी गेस्ट म्हणून बोलवलेलं' तर अधिकारी म्हणतात...


एनसीबी सूत्रांनी सांगितलं की, त्या बड्या अभिनेत्याच्या मुलानं चौकशी दरम्यान सांगितलं की, त्याला व्हिआयपी गेस्ट म्हणून तिथं बोलवलं होतं. त्याच्याकडून क्रुझवर येण्यासाठी कुठलीही फी घेतली नव्हती. त्यानं म्हटलं आहे की, माझ्या नावाचा वापर करुन बाकीच्यांना बोलावलं गेलं. या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या लोकांची आज चौकशी होणार आहे. अद्याप कुणाला अटक केलेलं नसल्याची माहिती समीर वानखेडे यांनी दिली आहे. आज चौकशीदरम्यान नेमकी काय माहिती समोर येतेय याकडे लक्ष लागून आहे. सोबतच त्या बड्या अभिनेत्याच्या मुलाला अटक केली जाईल का? हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे. 


क्रुझवर कसं पोहोचलं ड्रग्ज


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, या प्रकरणात सहभागी असलेल्या लोकांनी आपल्या पॅंट, अंडरवेअर, कॉलरच्या सिलाईमध्ये तसंच महिलांनी आपल्या पर्सच्या हॅंडलमध्ये लपवून आणलं होतं. 


मुंबई विमानतळावरुन 5 कोटींचं ड्रग्ज जप्त, NCBची कारवाई, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला ड्रग्ज पाठवलं जात असल्याची   


त्यानंतर अधिकाऱ्यांनी या क्रूझवर छापा मारत दहाहून अधिक जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, काही जणांची रात्रीत चौकशी केल्यानंतर सोडून देण्यात आले. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या 8 ते 10 जणांपैकी एक जण बॉलिवूडमधील बड्या अभिनेत्याचा मुलगा देखील असल्याची माहिती आहे. यात काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं जरी असलं तरी आज कुणालाही कोर्टात हजर केलं जाणार नसल्याचं एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी सांगितलं आहे. सोबतच कोणालाही अटक केली नसून तपास सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या चौकशीत काय माहिती पुढे येते आणि बड्या अभिनेत्याच्या मुलाला अटक केली जाते का? हे पाहाणं महत्त्वाचे असणार आहे. सोबतच आणखी एका अभिनेत्याची मुलगी देखील यात असल्याची माहिती देखील समोर आली आहे. 


NCB Drug Arrest :1 कोटींचे ड्रग्ज जप्त, 5 पेडलर्सना बेड्या, भायखळा, रे रोड, बलार्ड पिअर भागात कारवाई


आठ तासांहून अधिक वेळ कारवाई
ही कारवाई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या टीमकडून करण्यात आली. आठ तासांहून अधिक वेळ क्रुझवर कारवाई सुरु होती. सूत्रांनी सांगितलं की, ही क्रुझ मुंबईवरुन गोव्याला चालली होती. जशी ही क्रुझ मुंबईवरुन निघाली तशी ड्रग्ज पार्टी सुरु झाली. एनसीबीची टीम आधीपासूनच क्रुझवर होती. मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मिळाल्यानंतर क्रुझ मुंबईकडे वळवण्यात आली. या छाप्यामध्ये बड्या अभिनेत्यांच्या मुलांची नाव समोर येत असल्यानं छाप्यादरम्यान सर्व एनसीबीच्या टीमच्या कर्मचाऱ्यांचे फोन बंद करण्यात आले. छापेमारीची कारवाई पूर्ण होईपर्यंत त्यांचे फोन बंद होते.