अभिनेत्री समंथा अक्किनेनी (Samantha Akkineni) आणि नागा चैतन्य  (Naga Chaitanya) यांनी नुकतीच सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाची माहिती दिली. या पोस्टमध्ये त्यांनी वेगळं होण्याच्या निर्णयाबद्दल सांगितले.अनेकांनी त्यांच्या या पोस्टवर कमेंट्स केल्या. आपल्या  वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रनौतने (kangana ranaut) समांथा आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटावर सोशल मीडियावर तिचं मत मांडले आहे.    


कंगना सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. वेगवेगळ्या विषयांवर ती पोस्ट करून मतं मांडत असते. कंगनाची सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्ट चर्चेत असते. नुकतीच कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट केली, 'जेव्हा पण घटस्फोट होतो, तेव्हा दोष नेहमी पुरूषांचीचं असते. माझं हे बोलणं तुम्हाला जजमेंटल वाटत असेल. पण देवाने पुरूष आणि महिलांना असंच बनवले आहे. अशा लोकांवर दया करणं बंद करा जे महिलांना कपड्यांप्रमाणे बदलतं राहतात आणि नंतर त्यांच्यासोबत मैत्री ठेवतात. यामध्ये शंभरामधील एक महिला चुकीची असू शकते सर्वांची नाही. '


Samantha-Naga Chaitanya | सामंथा आणि नागा चैतन्य यांच्यात घटस्फोट! लग्नाच्या चार वर्षानंतर विभक्त


समंथाची पोस्ट
समंथाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून तिच्या घटस्फोटाबद्दल चाहत्यांना सांगितले होते. पोस्टमध्ये समंथाने लिहीले, 'आमच्या सर्व हितचिंतकांसाठी.. खूप विचार केल्यानंतर, चैतन्य आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही पती-पत्नीसारखे आमचे मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्ही दहा वर्षांहून अधिक काळ मित्र आहोत जे आमच्या नात्याचा आधार होता. आमच्यात मैत्री कायम राहील. आम्ही आमच्या चाहत्यांना, हितचिंतकांना आणि माध्यमांना विनंती करतो की तुम्ही सर्वांनी आमच्या या कठीण काळात आम्हाला साथ द्या आणि आमच्या दोघांनाही पुढे जाण्यासाठी प्रायव्हसी द्या. तुमच्या सर्वांच्या समर्थनाबद्दल खूप आभार.'


समंथा आणि नागा चैतन्यची लव्ह स्टोरी 
‘ये माया चेसावे’ या तेलगू चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान समंथा आणि नागा चैतन्यची भेट झाली. त्यानंतर  ‘ऑटोनगर सूर्या’ या चित्रपटाच्या सेटवर ते पुन्हा भेटले. ६ ऑक्टोबर २०१७ रोजी समंथा आणि नाग चैतन्य लग्नबंधनात अडकले.