Mahadev App : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ, खिलाडी ॲप प्रकरणी गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
Mahadev App : माटुंगा पोलीस ठाण्यात खिलाडी ॲप संदर्भात झालेल्या गुन्ह्यात बॉलीवूड अभिनेता साहिल खानदेखील (Sahil Khan) सहभागी आहे.
Mumbai : मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) पहिल्यांदाच महादेव बेटिंग अॅपचा (Mahadev App) प्रवर्तक सौरभ चंद्राकर (Saurabh Chandrakar) याच्यासह 31 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जुगार, फसवणुकीच्या कलमातंर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, हा गुन्हा महादेव अॅपऐवजी खिलाडी हे बेकायदेशीर बेटिंग अॅप चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता याप्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. माटुंगा पोलीस ठाण्यात खिलाडी ॲप संदर्भात झालेल्या गुन्ह्यात बॉलीवूड अभिनेता साहिल खानदेखील (Sahil Khan) सहभागी आहे.
साहिल खानचं बेटिंग अॅप ऑपरेटर म्हणून एफआयआरमध्ये नाव नोंदवण्यात आले आहे. माटुंगा पोलिसांनी 31 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केल आहे. आता या प्रकरणाची एफआयआर कॉपी समोर आल्याने एक धक्कादायक खुलासा समोर आला असून त्यानुसार या एफआयआरमध्ये अभिनेता साहिल खानचेही नाव आहे.
साहिल खानच्या अडचणीत वाढ
साहिल खानचे नाव एफआयआरमध्ये आरोपी क्रमांक 26 आहे. साहिल खानवर महादेव ऑनलाइन बेटिंग अॅपशी संबंधित आणखी एक बेटिंग अॅप चालवल्याचा आरोप आहे, तो म्हणजे साहिल खानवर केवळ प्रमोशनचाच नाही तर अॅप ऑपरेट करून प्रचंड नफा कमावल्याचा आरोप आहे. याआधी साहिल खान दुबईमध्ये ऑनलाइन बेटिंग अॅपच्या एका पार्टीच्या व्हिडिओमध्ये दिसला होता. त्यावेळी प्रमोशनल व्हिडीओ म्हणून ज्याचे वर्णन करण्यात आले होते, आता एफआयआरमध्ये अॅप ऑपरेटर म्हणून नाव आल्याने साहिल खानच्या अडचणी वाढणार आहेत.
साहिलच्या अडचणी वाढू शकतात. खिलाडी नावाचे बेटिंग अॅप चालवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माटुंगा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये डाबर कंपनीच्या काही प्रमुख लोकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असल्यीची माहिती समोर येत आहे.
सौरभ चंद्राकरसह 31 जणांविरोधात गुन्हा दाखल
माटुंगा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांच्या तक्रारीच्या आधारे माटुंगा पोलिसांनी महादेव बेटिंग अॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर, रवी उप्पल आणि शुभ सोनी यांच्यासह एकूण 31 हून अधिक जणांविरुद्ध फसवणूक आणि जुगाराच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 15 हजार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते बनकर यांनी केला आहे. खिलाडी अॅपच्या माध्यमातून आरोपी जुगार व इतर खेळ खेळत होते. तसेच या अॅपच्या माध्यमातून ते अवैध कमाई करत होते.
'या' कलमाअंतर्गत गुन्हा दाखल
माटुंगा पोलिसांनी साहिल खान, गौरव बर्मन, मोहित बर्मन आणि इतरांविरुद्ध आयपीसी कलम 420,465,467,468,471,120 (बी) अंतर्गत गुन्हा दाखल केला. गौरव बर्मन आणि मोहित बर्मन यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तक्रारदाराच्या आधारे गुन्हा नोंदवला आहे, या सट्टेबाजीत दोघांचेही सहकार्य असल्याचे पोलिसांनी त्यांच्या एफआयआर कॉपीमध्ये नमूद केले आहे. आरोपी सौरभ चंद्राकर, रवी उप्पल व इतरांना दर महिन्याला हवाला व्यवहारातून पैसे मिळत होते.
संबंधित बातम्या