एक्स्प्लोर

सलमानच्या सुटकेसाठी कतरिना सिद्धिविनायकाच्या चरणी

अभिनेत्री कतरिना कैफ आणि सलमानची बहीण अर्पिता यांनी गुरुवारी मध्यरात्री बारा वाजता मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं.

मुंबई : बहुचर्चित काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर न्यायालय आज निकाल देणार आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या सुटकेसाठी त्याची जवळची मैत्रिण, सुप्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ सिद्धिविनायकाच्या चरणी आली. कतरिना सलमानची बहीण अर्पितासोबत बाप्पाच्या दर्शनाला आली होती. कतरिना आणि अर्पिता यांनी गुरुवारी मध्यरात्री बारा वाजता मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. काळवीट शिकार प्रकरणातून सलमानची निर्दोष मुक्तता व्हावी, यासाठी दोघींनी बाप्पासमोर हात जोडल्याचं म्हटलं जातं. हिट अँड रन प्रकरणात सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यातून सुटका झालेला सलमान खान काळवीट शिकार प्रकरणी अडकणार का? याचं उत्तर आज राजस्थानातील जोधपूर कोर्टात मिळणार आहे. 20 वर्ष जुन्या काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणाचा अंतिम निकाल येणं आज अपेक्षित आहे. जोधपूर न्यायालयाचे पिठासीन अधिकारी देवकुमार खत्री निकाल देणार आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी अभिनेता सलमान खान, सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तब्बू जोधपूरमध्ये दाखल झाले आहेत. वीस वर्षांपूर्वी म्हणजे 1998 मध्ये 'हम साथ साथ है' चित्रपटाचं चित्रीकरण जोधपूरमध्ये सुरु होतं. त्यावेळी सलमानने घोडा फार्म हाऊस आणि भवाद गावात 27-28 डिसेंबरच्या रात्री हरणांची, तर कांकाणी गावात 1 ऑक्टोबरला काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे. नेमकं प्रकरण काय आहे? काळवीट शिकार प्रकरण 27 आणि 28 सप्टेंबर 1998 सालचं असल्याचं म्हटलं जातं. सलमान खान दिग्दर्शक सुरज बडजात्या यांच्यासोबत 'हम साथ साथ है' या सिनेमाचं शूटिंग जोधपूरमध्ये करत होता. यावेळी 27 सप्टेंबरच्या रात्री तो सहकलाकार सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्यासोबत शिकारीसाठी निघाला. यावेळी सलमानने संरक्षित वन्य जीवांच्या यादीत असलेल्या दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. याशिवाय विविध दोन ठिकाणी काळवीटाची शिकार केल्याचाही त्याच्यावर आरोप करण्यात आला. त्यामुळे त्याच्यावर एकूण चार खटले दाखल आहेत. कोणकोणत्या केस दाखल 1. कांकाणी गाव केस - 5 एप्रिलला फैसला होणार. गोळीचा आवाज ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी आले. तेव्हा सलमानने इतर कलाकारांसोबत गाडीतून पळ काढला, तर दोन्ही हरणांचे मृतदेह तिथेच पडून होते. 2. घोडा फार्म हाऊस केस - 10 एप्रिल 2006 रोजी सीजेएम कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली. सलमान हायकोर्टात गेला. 25 जुलै 2016 रोजी त्याची सुटका करण्यात आली. राज्य सरकारने या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली. 3. भवाद गाव केस - सीजेएम कोर्टाने 17 फेब्रुवारी 2006 रोजी सलमानला दोषी ठरवून एका वर्षाची सुनावली. हायकोर्टाने या  प्रकरणातही सलमानची मुक्तता केली. राज्य सरकारने या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली. 4. शस्त्रास्त्र केस - 18 जानेवारी 2017 रोजी कोर्टाने सलमानची सुटका केली. राज्य सरकारने या निर्णयाविरोधात हायकोर्टात दाद मागितली. सलमान खानविरोधात वन्यजीव संरक्षण कायदा, कलम 51 आणि अन्य कलाकारांविरोधात वन्यजीव संरक्षण कायदा, कलम 51 आणि भारतीय दंड विधान कलम 149 अंतर्गत बेकायदेशीरपणे एका जागी जमण्याचा गुन्हा दाखल आहे. सलमान खान अवैध शस्त्र खटल्यातूनही सुटला! अभिनेता सलमान खानला जोधपूर कोर्टाने या वर्षाच्या सुरुवातीला 17 जानेवारीला मोठा दिलासा दिला. अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणाच्या खटल्यातून सलमान खान सुटला. काळवीट शिकार केसमध्ये अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी सलमानविरोधात जोधपूर न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. या खटल्यात सलमानला संशयाचा फायदा मिळाला. त्यामुळे सलमान निर्दोष सुटला. सरकारी वकिलांचा युक्तिवाद काय? त्या रात्री सर्व कलाकार जिप्सी कारमध्ये होते, असा दावा सराकरी वकील भवानी सिंह भाटी यांचा आहे, तर सलमान खान जिप्सी चालवत असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. काळवीट पाहताच त्याने गोळी चालवली आणि यामध्ये दोन काळवीटांचा मृत्यू झाला. लोकांनी जेव्हा हा सर्व प्रकार पाहिला तेव्हा या कलाकारांचा पाठलाग केला, मात्र सर्व जण मृत काळवीटांना सोडून पळून गेले, असा दावा सरकारी वकिलांनी केला आहे. सलमानच्या वकिलांचा दावा फिर्यादींच्या दाव्यात अनेक प्रकारच्या उणिवा असून काळवीटाचा मृत्यू गोळी मारल्यानेच झाला होता का, हे अजून फिर्यादींनी सिद्ध केलेलं नाही, असं सलमानचे वकील एच. एम. सारस्वत यांचं म्हणणं आहे. काळवीटांचा मृत्यू गोळी मारल्यानेच झाला होता का, हा प्रश्न आहे आणि अशा प्रकारच्या तपासावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही, असा प्रतिदावा सलमानच्या वकिलांनी केला. या प्रकरणात दुष्यंत सिंह आणि दिनेश सिंह हे आणखी दोन आरोपी आहेत. काळवीटांची शिकार करताना दुष्यंत सिंह सलमानच्यासोबत होता, असं बोललं जातं, तर दिनेश सिंह हा सलमानचा सहाय्यक असल्याचं बोललं जातं. खटला कुणी दाखल केला? सलमान खानसह सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्याविरोधात बिष्णोई समाजातील लोकांनी पोलिसात गुन्हा दाखल केला. त्यावेळी सलमानवर तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र अटक करताना पोलिसांनी सलमानच्या रुममध्ये दोन रायफल मिळाल्या, ज्यांचा परवाना संपलेला होता. त्यानंतर त्याच्याविरोधात शस्त्रास्त्र कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. किती वर्षांची शिक्षा? वन्य जीवन अधिनियमाच्या कलम 149 अंतर्गत काळवीट शिकारीसाठी सात वर्षांपेक्षा जास्त कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. काही वर्षांपूर्वी ही शिक्षा सहा वर्षांपर्यंत होती. सलमानचं प्रकरण 20 वर्ष जुनं आहे. अशा स्थितीत सहा वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा शक्य आहे. हे कलम सह आरोपींवरही लागू होणार.

संबंधित बातम्या

काळवीट शिकारप्रकरणाचा आज निकाल, आरोपी सिनेस्टार जोधपूरमध्ये

काळवीट शिकार : सलमानसह इतर कलाकार जोधपुरात दाखल

जोधपूर विमानतळावर अभिनेत्री तब्बूसोबत गैरवर्तन

काळवीट शिकार प्रकरणी सलमानचा फैसला 5 एप्रिलला

काळवीट शिकारप्रकरण, सैफ, तब्बू, सोनाली यांची जोधपूर न्यायालयात हजेरी

सात वर्षांची शिक्षा झाल्यास सलमान जोधपूर कोर्टातून थेट तुरुंगात

आर्म्स अॅक्ट प्रकरण : कोर्टात जात विचारल्यावर सलमान म्हणाला...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Raj Thackeray Speech Funny : राज ठाकरे यांचा डायलॉग...पत्नी, लेक आणि श्रीकांत खळखळून हसले!ABP Majha Headlines : 10 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray : मनसेचे 6 नगरसेवक खोके देऊन फोडले, उद्धव ठाकरेंवर पहिला वार... ABP MajhaRaj Thackeray On Sushma Andhare : लावरे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरेंनी लावला सुषमा अंधारेंचा व्हिडिओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
Embed widget