एक्स्प्लोर

Mukta Barve : 'वाय'च्या विशेष शोमध्ये चाहत्याने केला लेकीचा नामकरण विधी; नाव ठेवले 'मुक्ता'

Mukta Barve : मुक्ता बर्वेचा 'वाय' सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे.

Mukta Barve : स्त्री भ्रूण हत्या या गंभीर विषयावर भाष्य करणाऱ्या 'वाय'ने (y) अनेक स्त्रियांना संवेदनशील विषयावर पुढे येऊन बोलण्यास प्रोत्साहन दिले. अनेक महिला प्रेक्षकांनी आपले अनुभव 'वाय'च्या टीमसोबत शेअर केले. अशा प्रतिक्रिया येत असतानाच आता कोल्हापूरमधील सई राजेशिर्के देशमाने आणि मनोज देशमाने या जोडप्याने या सिनेमाने प्रेरित होऊन आगळयावेगळया पद्धतीने आपल्या मुलीच्या नामकरण विधी करण्याचे ठरवले. त्यांनी 'वाय'चा एक खास शो कोल्हापूरमध्ये आयोजित केला होता. या शोच्या दरम्यान थिएटरमध्येच त्यांनी नामकरण विधीही घडवून आणला. 

मोठमोठे हॉल घेऊन थाटामाटात मोठा समारंभ साजऱ्या करणाऱ्या युगात एखाद्या थिएटरमध्ये आपल्या मुलीचे बारसे करणे आणि 'वाय' सारखा सिनेमा यावेळी दाखवून मौल्यवान संदेश समाजात पोहोचवण्याचा प्रयत्न करणे, हा नक्कीच कौतुकास्पद प्रयोग आहे. विशेष बाब म्हणजे या वेळी देशमाने जोडप्याने आपल्या मुलीचे नाव 'मुक्ता' ठेवले. एखाद्या सिनेमाने प्रभावित होऊन हा विषय जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी बारशाचे असे आयोजन करणे, हे असे बहुदा पहिल्यांदाच घडले असावे. हा विषय असा आहे की, तो घराघरात पोहोचणे खूप गरजेचे आहे. याचे गांभीर्य कळले तरच याबाबत जागरूकता निर्माण होऊ शकते आणि या जोडप्याचा नामकरण विधीच्या निमित्ताने हा विषय लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे. 

आपल्या मुलीचा नामकरण विधी अशाप्रकारे साजरा करण्याबाबत सई राजेशिर्के - देशमाने म्हणाले,"लग्नाच्या दहा वर्षांनंतर आम्हाला कन्यारत्न झाले आणि याचा आम्हाला आनंदच आहे. यापूर्वी मुलगाच हवा, वंशाचा दिवाच हवा, ही अशी वाक्ये मी स्वतः अनुभवली आहेत. 'वाय'च्या कथेत आणि माझ्या आयुष्यात खूप साम्य आहे. त्यामुळे आम्ही 'मुक्ता'चे बारसं अशा पद्धतीने करण्याचे ठरवेल. हा सिनेमा पाहून मुलगी म्हणजे ओझे मानणाऱ्या लोकांच्या मानसिकतेत थोडा जरी फरक पडला, तर आमचा हेतू साध्य झाल्याचा आम्हाला आनंद होईल. असे सिनेमे बनायला हवेत आणि मुख्य म्हणजे असे सिनेमे प्रेक्षकांनी पाहायला हवेत". तर मनोज देशमाने म्हणाले, "आम्हाला सुरुवातीपासूनच मुलगी व्हावी, असे मनापासून वाटत होते. आज 'मुक्ता'च्या निमित्ताने आमची ही इच्छा पूर्ण झाली. आम्ही स्वतःला खूप नशीबवान समजतो की आमच्या पोटी मुलीने जन्म घेतला. आमच्या मुलीचे नाव मुक्ता ठेवण्याचे कारण हे की, मुक्ता म्हणजे मुक्त, जिला कसलंही बंधन असू शकत नाही आणि हा विचार प्रत्यक्षात उतरावा, लोकांपर्यंत पोचावा म्हणून असा निर्णय घेतला. त्याशिवाय आणखी एक कारण म्हणजे 'वाय' मधील प्रमुख अभिनेत्री मुक्ता बर्वे. ती स्वतः एक उत्तम अभिनेत्री तर आहेच, 'वाय'मधील तिचा धाडसीपणाही मनाला भिडणारा आहे. पण त्याहीपुढे जाऊन मुक्ताने स्वतःचे असे जे स्थान निर्माण केले आहे आणि त्यातून एक मोठा आदर्श समाजासमोर ठेवला आहे, तो खरोखरच प्रेरणादायक आहे. आणि हा विचारही 'मुक्ता' नावामागे होता".

आगळयावेगळया सोहळ्याबद्दल आणि त्यामागील इतक्या मोठ्या विचाराबद्दल या जोडप्यावर कौतुकाचा वर्षांव होत आहे. एखादा सामाजिक विषय असलेला सिनेमा प्रदर्शित व्हावा आणि त्याचे सकारात्मक पडसाद उमटावेत, याहून आनंदाची गोष्ट असूच शकत नाही. 

संबंधित बातम्या

Y Marathi Movie : 'वाय'च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव; स्त्री भ्रूण हत्येवर भाष्य करणारा सिनेमा

Y Movie Review : वाय | प्रबोधन, मनोरंजन आणि झणझणीत अंजन !

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget