Shloka Ambani : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी (Akash Ambani) आणि त्याची पत्नी श्लोका अंबानी (Shloka Ambani) लवकरच आई-बाबा होणार आहेत. नुकताच श्लोकाच्या (Shloka Mehta) डोहाळेजेवणाचा कार्यक्रम पार पडला आहे. 


'नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रा'चा (Nita Mukesh Ambani Cultural Centre) उद्धाटन सोहळा गेल्या काही दिवसांपूर्वी दिमाखात पार पडला. या सोहळ्यात श्लोकाच्या बेबी बम्पने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आता श्लोकाच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रम तिच्या खास मैत्रिणींनी आयोजित केला होता. या डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ईशा अंबानीनेदेखील कार्यक्रमाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 






श्लोकाच्या डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमामध्ये तिच्या खास मैत्रिणी सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमादरम्यान श्लोकाने गुलाबी रंगाचा सुंदर गाऊन परिधान केला होता आणि डोक्यावर टियारा घातला होता. ईशाने शेअर केलेल्या फोटोमध्ये श्लोका तिच्या मैत्रिणींसोबत पोज देताना दिसत आहे. तसेच तिने हातात एक पेंटिंगदेखील धरलं आहे. हे पेंटिंग तिला तिच्या मैत्रिणींनी भेट म्हणून दिल्याचा अंदाज चाहते बांधत आहेत. 


मुकेश अंबानी आणि नीता अंबानी पुन्हा होणार आजी-आजोबा


उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी पुन्हा एकदा आजी-आजोबा होणार आहेत. श्लोका मेहता आणि आकाश अंबानीच्या पहिल्या मुलाचं नाव 'पृथ्वी' असं आहे. तर दुसरीकडे ईशा अंबानीने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. आता पुन्हा एकदा ते नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. 


श्लोका अंबानी कोण आहे? (Who Is Shloka Ambani )


श्लोका मेहता ही कोट्यवधी संपत्तीच्या मालकीन आहे. श्लोकाने धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलं. त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून कायद्याचं शिक्षण घेतलं. 2015 साली तिने 'कनेक्ट फॉर' नावाच्या लोककल्याणासाठी काम करणाऱ्या संस्थेची स्थापना केली. या संस्थेद्वारे ती गरजूंना शिक्षण, अन्न आणि निवारा उपलब्ध करुन देते. श्लोका अंबानी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. श्लोका आणि आकाश 2019 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. 


संबंधित बातम्या


Shloka Ambani Pregnancy : श्लोका अंबानी यांच्या बेबी बंपचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल