Gautami Patil : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमाला परवानगी नाकारलेली असतानादेखील कार्यक्रम घेतल्यानं पुण्यातील (Pune) भोसरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. वाढदिवसानिमित्त गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण परवानगी न घेता कार्यक्रम आयोजित केल्यामुळे बर्थडे बॉयसह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
सोमवारी अमित लांडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नृत्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारलेली असतानादेखील अमित लांडे यांनी जाहीर कार्यक्रमाचं आयोजन केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित लांडेसह आयोजक मयुर रानवडे अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यक्रम कुठल्याही गोंधळाविना पार पडला, असा दावा आयोजक रानवडे करत आहे. पण परवानगी न घेता कार्यक्रम आयोजित केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिपोर्टनुसार, बर्थडे बॉय अमित लांडे यांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. पण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून भोसरी पोलिसांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमासाठीची परवानगी नाकारली. पोलिसांनी परवानगी नाकारलेली असतानाही अमित लांडे आणि मयुर रानवडे यांनी गौतमीचा जाहीर कार्यक्रम आयोजित केला.
गौतमीच्या कार्यक्रमात लहान मुलेही थिरकले... (Gautami Patil Dance Show)
गौतमीने नुकतीच पिंपरी-चिंचवडकरांची (Pimpri-Chinchwad) मने जिंकली आहेत. पिंपरी-चिंचवडमधील कासारवाडीत अमित लांडेच्या वाढदिवसानिमित्त गौतमीच्या वाढदिवसाचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान गौतमीने आपल्या नृत्याने महिला आणि तरुण-तरुणींची मने जिंकली. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लहान मुलांनादेखील नृत्य करण्याचा मोह आवरता आला नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील गौतमीच्या कार्यक्रमात लहान मुलेही थिरकलेले पाहायला मिळाले.
पिंपरी चिंडवडमधील गौतमीचा कार्यक्रम गोंधळाविना पार पडला. तिच्या या कार्यक्रमाला पिंपरी-चिंडवडकर गर्दी करणार असल्याने पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच तिच्यासोबत तिचे सुरक्षारक्षकही होते. त्यामुळे तिच्या या कार्यक्रमाला गोंधळ झाला नाही. गौतमीने आपल्या नृत्याने चाहत्यांना मनोरंजनाची मेजवानी दिली.
गौतमी पाटीलचा मोठा चाहतावर्ग आहे. महाराष्ट्रभर तिची चांगलीच क्रेझ आहे. तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. गौतमीच्या कातिल अदा पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. दिवसेंदिवस गौतमीच्या कार्यक्रमाला मागणी वाढत आहे.
संबंधित बातम्या