Shloka Ambani Pregnancy : श्लोका अंबानी यांच्या बेबी बंपचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरी पुन्हा पाळणा हलणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुकेश आणि नीता (Nita Ambani) यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी (Akash Ambani) आणि त्यांची पत्नी श्लोका मेहता (Shloka Mehta) लवकरच आई-बाबा होणार आहेत.

श्लोका मेहता यांच्या बेबी बंपचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या (Nita Mukesh Ambani Cultural Center) उद्धाटन सोहळ्यादरम्यान श्लोका मेहता यांच्या बेबी बंपचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.
त्यानंतर अंबानींच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली.
श्लोका मेहता आणि आकाश अंबानी 2019 साली लग्नबंधनात अडकले. त्यानंतर 10 डिसेंबर 2020 रोजी त्यांना मुलगा झाला.
श्लोका मेहता यांनी शेअर केलेल्या फोटोत त्या खूपच आनंदी दिसत आहेत. श्लोका मेहता यांचा ग्लॅमरस लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
श्लोका मेहता आणि आकाश अंबानी यांच्या लेकाचे नाव 'पृथ्वी' असे आहे. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी ईशा अंबानी यांनी दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आहे.
त्यामुळे अंबानी कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. तसेच नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी अंबानी कुटुंबिय सज्ज आहेत.