Movies Release In March 2024 :  मार्च महिना सिनेरसिकांसाठी खास असणार आहे. मार्च महिन्यात 8 चित्रपट प्रदर्शित (Movies List Release In March 2024) होणार आहेत. मार्च महिन्यातील पहिल्या शुक्रवारपासून ते महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारपर्यंत सिनेरसिकांना थ्रिलरपटासह वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांचा पर्याय असणार आहे. मार्च महिन्याची सुरुवात किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज'ने होणार आहे. महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनॉन यांच्या 'क्रू' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 


>> कोणत्या दिवशी कोणता चित्रपट होणार प्रदर्शित?


- 1 मार्च 


दिवंगत अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा शेवटचा चित्रपट 'कागज 2' हा 1 मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. व्ही. प्रकाश यांनी या  चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्याशिवाय, या चित्रपटासोबतच किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' (Laapata Ladies) देखील प्रदर्शित होणार आहे. रवी किशनची यात प्रमुख भूमिका आहे. आमिर खानप्रमाणे किरण रावच्या या सिनेमातही भव्यदिव्य सेट, बडे कलाकार नाहीत.नुकतेच लग्न झालेले दोन जोडपे एका ट्रेनमध्ये चढतात. दोन्ही नववधूंच्या चेहऱ्यावर मोठे बुरखे आहेत. ते दोघे ट्रेनमधून उतरण्याच्या घाईत कसे बेपत्ता होतात... आणि पुढे काय होते? याची गोष्ट 'लापता लेडीज' या सिनेमात दाखवण्यात आली आहे



- 8 मार्च


8 मार्च रोजी बॉक्स ऑफिसवर 'शैतान' आणि 'डबल आयस्मार्ट' यांच्यात टक्कर होणार आहे. जिथे अजय देवगण आणि आर माधवन 'शैतान'मध्ये दिसणार आहेत. संजय दत्त 'डबल iSmart' मध्ये झळकणार आहे. शैतानच्या ट्रेलरने सिनेरसिकांची उत्सुकता चांगलीच  ताणली गेली आहे. 


- 15 मार्च


पहिल्या आणि दुसऱ्या शुक्रवारप्रमाणेच मार्चचा तिसरा शुक्रवारही धमाल असणार आहे. सिद्धार्थ मल्होत्राचा 'योद्धा' आणि अदा शर्माचा 'बस्तर: द नक्सल स्टोरी' 15 मार्चला रिलीज होत आहे.


- 22 मार्च


अंकिता लोखंडे आणि रणदीप हुड्डा यांचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट 22 मार्चला प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट स्वातंत्र्यवीर म्हणून उपाधी मिळालेले विनायक दामोदर सावरकर यांच्यावर आधारित आहे. 


- 29 मार्च


तब्बू,  करीना कपूर खान आणि कृती सेनन यांची प्रमुख भूमिका असलेला 'क्रू' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश कृष्णन यांनी केले आहे. या चित्रपटात दिलजीत दोसांझ आणि कपिल शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 


 इतर संबंधित बातमी :