Shaitaan Trailer :  अजय देवगण (Ajay Devgan) आणि ज्योतिकाची (Jyotika) भूमिका असणारा शैतान (Shaitaan) चित्रपटाचा ट्रेलर लाँच (Shaitaan Trailer Launched) करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वीच चित्रपटात खलनायकी भूमिका साकारणाऱ्या आर. माधवनचा (R. Madhavan) फर्स्ट लूक आउट करण्यात आला होता. चित्रपटाच्या टीझरने सिनेरसिकांची उत्सुकता वाढवली होती.  त्यानंतर आज, थरकाप उडवणारा शैतानचा ट्रेलर लाँच करण्यात  आला आहे. 


कसा आहे शैतानचा ट्रेलर?


'शैतान' चित्रपटाचा ट्रेलर एका घरात बसलेल्या माणसाने सुरू होतो. मोबाईल फोनची बॅटरी डेड झाल्याने फोन चार्जिंगसाठी 15 मिनिटे मागणाऱ्या माधवनला अजय देवगण माणुसकीच्या नात्याने फोन चार्ज करण्याची मुभा देतो. मात्र, त्याच वेळी ज्योतिकाला त्याच्यावर संशय येतो आणि अजय देवगणला त्याला घरातून निघून जाण्यास सांगते. अजय देवगण ज्यावेळी त्याला घरा बाहेर जाण्यास सांगतो तेव्हा अजय देवगणची मुलगी माधवनच्या बाजूने उभी राहते आणि त्याला घरात थांबवण्यासाठी आग्रह धरते. इतकंच नव्हे तर माधवन जसे सांगतो तसे ती मुलगी वागते. नेमकं माधवनने केले काय, अजय देवगण-ज्योतिकावर कोणता बाका प्रसंग ओढावतो. त्यांची मुलगी माधवनचे कसं काय ऐकते, असा थरारक चित्रण या ट्रेलरमध्ये आहे. 






अभिनयाची जुंगलबंदी रंगणार


चित्रपटाच्या ट्रेलरवरून या चित्रपटात अभिनयाची जुगलबंदी रंगणार हे निश्चित आहे. ट्रेलरवरून चित्रपट प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा असल्याची अपेक्षा आहे. अजय देवगण, आर. माधवन, ज्योतिका आणि जानकी बोडीवाला यांचा दमदार अभिनय असणार आहे.  'शैतान' चित्रपटाचा संपूर्ण ट्रेलर ट्विस्ट आणि रंगतदार वळणांनी भरलेला आहे आणि एकदम स्फोटक आहे. विकास बहल यांनी दिग्दर्शक केलेला हा चित्रपट 8 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. 


'शैतान'च्या माध्यमातून ज्योतिकाचं कमबॅक


'शैतान' या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री ज्योतिका 25 वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. 1997 मध्ये तिचा 'डोली सजा के रखना' (Doli Saja Ke Rakhna) हा हिंदी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाच्या माध्यमातून तिने हिंदी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. पुढे दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीत तिने पाऊल ठेवलं. 


 पाहा : शैतान चित्रपटाचा थरकाप उडवणारा ट्रेलर