Kanni :  मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) सध्या त्यांच्या आगामी 'कन्नी' (Kanni) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टाळ्या, शिट्यांच्या जल्लोषात हृता दुर्गुळेच्या 'कन्नी'चा ट्रेलर आऊट करण्यात आला आहे.


टाळ्या, शिट्यांच्या जल्लोषात  ‘कन्नी’चा ट्रेलर आऊट!


 ‘कन्नी’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच दणक्यात पार पडला. यावेळी चित्रपटातील कलाकार ऋता दुर्गुळे, शुभंकर तावडे, वल्लरी विराज, ऋषी मनोहर आणि अजिंक्य राऊत यांनी चित्रपटातील गाण्यांवर धमाकेदार परफॅार्मन्स सादर केले. या सोहळ्यात अधिक रंगत आणली ती गाण्यांच्या लाईव्ह परफॅार्मन्सने. एकंदरच टाळ्या, शिट्या, धमाल असे उत्साही वातावरण होते. कलाकारांनी यावेळी काही मजेदार किस्सेही शेअर केले. या सोहळ्याला चित्रपटाच्या संपूर्ण टीमसह अनेकांची उपस्थित होती. 


‘कन्नी’ कधी होणार रिलीज? (Kanni Release Date) 


समीर जोशी लिखित, दिग्दर्शित ‘कन्नी’ चित्रपट येत्या 8 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची निर्मिती अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी यांनी केली आहे. चित्रपटाची खासियत म्हणजे अमित भरगड, गगन मेश्राम आणि सनी राजानी यांचा बऱ्याच बॅालिवूड चित्रपटांमध्ये सहभाग आहे आणि त्यांचे सहकार्य ‘कन्नी’ला लाभले आहे. 






‘कन्नी’ची प्रेक्षकांना उत्सुकता


मैत्री, प्रेम आणि स्वप्नं यांना एकत्र बांधून ठेवणारा चित्रपट म्हणजे ‘कन्नी’. प्रेक्षक ‘कन्नी’ची आतुरतेने वाट पाहात असतानाच आता ‘कन्नी’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये ऋताचे परदेशात स्थायिक होण्याचे स्वप्न आहे, मात्र यात अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. आता या अडचणीतून हृता कशी बाहेर पडणार, तिला तिचा नवरोबा मिळणार आणि यात तिला तिचे मित्र साथ देणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे चित्रपट पाहिल्यावर मिळणार आहेत. 


‘कन्नी’ चित्रपटाबद्दल दिग्दर्शक म्हणतात, "नाते हे आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्वाचे आहे. मग ते मैत्रीचे असो वा प्रेमाचे. ही नातीच आपल्यासोबत शेवटपर्यंत असतात. ‘कन्नी’मध्ये हेच पाहायला मिळणार आहे. पडद्यावरील आणि पडद्यामागील ‘कन्नी’ची टीम कमाल आहेच. अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर आणि सनी राजानी यांचे सहकार्य लाभल्यामुळे आज ही कलाकृती आपल्या भेटीला येत आहे. मला खात्री आहे, मैत्री, प्रेम आणि स्वप्नांचा मागोवा घेणारी ‘कन्नी’ प्रेक्षकांना आवडेल. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे, जो कुटुंबासोबत एन्जॅाय करावा". 


संबंधित बातम्या


Hruta Durgule Ajinkya Raut : हृता दुर्गुळे अन् अजिंक्य राऊतचे झाले 'मन बावरे'; 'कन्नी'तील रोमँटिक गाणं आऊट!