एक्स्प्लोर

रिव्ह्यू : पटाखा

या चित्रपटात बढकीची भूमिका साकारणारी राधिका मदन हे सरप्राईज आहे. तितकीच कौतुकाची थाप सान्या मल्होत्रालाही.

विशाल भारद्वाज हा एक कमाल दिग्दर्शक आहे. म्हणजे, त्यांनी सिनेमे कसे केले हा मुद्दा नाही. पण सतत काहीतरी नवं करू पाहणारा, सांगू पाहणारा दिग्दर्शक असं यांचं वर्णन करायला हवं. शिवाय ते उत्तम संगीतकारही आहेत. संगीताची जाण असल्यामुळे भावनेची गुंफण करणं त्यांना शक्य होत असावं. आता त्यांचा नवा सिनेमा आला आहे पटाखा. खरंतर याचा ट्रेलर पाहून सिनेमाचा अंदाज येतो. एकमेकीशी अजिबात न पटणाऱ्या मुलींची ही गोष्ट आहे. अर्थात घरातली भावंडांची भांडणं हा नवा विषय नाही. पण या भांडणांचं काय टोक होऊ शकतं याचा प्रत्यय हा सिनेमा पाहताना येतो. दंगल गर्ल सान्या मल्होत्रा आणि राधिका मदन यांचा उत्तम अभिनय ही या सिनेमाची जमेची बाजू.
चरणसिंग पथिक यांच्या दो बहने या लघुकथेवर हा सिनेमा बेतला आहे. चुटकी आणि बडकी या दोन बहिणी. आई लहानपणीच गेल्यानं वडिलांनी अत्यंत प्रेमाने त्यांना वाढवलेलं. पण या दोन्ही मुली म्हणजे, एकमेकींच्या कमाल वैरी आहेत. तितक्याच मोकळ्या आणि दबंग आहेत. यांच्या भांडणाची ही गोष्ट वाढत्या वयानुसार वाढत जाणारं हे भांडण असल्यामुळे त्यात क्रमाक्रमाने नव्या नव्या व्यक्तिरेखा अॅड होत जातात. त्यामुळे या भांडणाची छटाही बदलते. त्याचप्रमाणे त्याची व्याप्तीही वाढते.
छायांकन, संगीत, संकलन या सर्वच पातळ्यांवर हा चित्रपट आपल्या अपेक्षा पूर्ण करतो. मुद्दा आहे तो किंचित तोचतोचपणा येतो त्याचा. शेवटी दोघींचं भांडण केंद्रस्थानी असल्यामुळे त्यांच्यातले वाद, संवाद याचा तोचतोचपणा जाणवतो. पण तो काही काळ. ही गोष्ट लवकर पुढे सरकल्याने त्याचा कंटाळा येत नाही.
या चित्रपटात बढकीची भूमिका साकारणारी राधिका मदन हे सरप्राईज आहे. यापूर्वी काही टीव्ही मालिकांमधून आपण  तिला पाहिलं होतं. आता या चित्रपटातून तिने बाॅलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तिने अत्यंत आत्मविश्वाासाने आपली भूमिका निभावली आहे. तितकीच कौतुकाची थाप सान्या मल्होत्रालाही. दोघींच्या अभिनयामुळे हा सिनेमा खिळून राहतो. या दोघींसह सुनील ग्रोव्हर, विजय राज यांच्या भूमिकाही उत्तम झाल्या आहेत.
एकूणात हा सिनेमा पाहताना मजा येते. समजायला सोपा. खुसखुशीत आाणि दोघींचा संघर्ष असल्यामुळे कमालीचा वेगवान असा हा सिनेमा बनला आहे. या चित्रपटाला पिक्चर बिक्चरमध्ये मिळताहेत 3 स्टार्स

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Death Bharti Achrekar: 'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
Kranti Redkar Controversy: मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
Salman Khan Youtube: सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार
सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार
Lagna Ani Barach Kahi: Gen-Z च्या संसाराची गोष्ट उलगडणार! पूजा सावंत अन् अभिजीत खांडकेकरची जोडी, 'लग्न अन् बरंच काही' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Gen-Z च्या संसाराची गोष्ट उलगडणार! पूजा सावंत अन् अभिजीत खांडकेकरची जोडी, 'लग्न अन् बरंच काही' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Embed widget