एक्स्प्लोर

आर्टिकल 15 : रुजलेल्या जातीपातीवर टाकलेला प्रकाश

भारतीय राज्यघटनेतलं कलम 15 काय सांगतं? तर ते जातीपातीच्या राजकारणापलिकडे जात सर्वधर्मसमभावचा नारा देतं. पण आज आपल्याला त्याचा विसर पडला आहे. आज ग्लोबलायझेशनच्या दुनियेतही अनेक छोट्या छोट्या गावात जातीपातीचं राजकारण खेळलं जातं. दलितांना हीन वागणूक मिळते आहे. आर्टिकल 15 ची गोष्ट अशाच उत्तर प्रदेशातल्या एका गावातली आहे.

ड्रायव्हर गाडी चालवता चालवता नव्याने आलेल्या पोलीस अधिक्षकाला म्हणतो, चार वर्ण आहेत. समाजाची घडी बसावी म्हणून ते केले गेले. ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्य, क्षूद्र. हे वर्ण.. जाती व्यवस्था नष्ट केली तर मग प्रत्येकालाच राजा व्हावंसं वाटेल. मग समाज कसा चालणार? यावर अधीक्षक निरुत्तर होतो. काय बोलावं त्याला कळत नाही. तो हाच प्रश्न टाईप करुन आपल्या शहरातल्या बायकोला पाठवतो. ती चळवळीतली बाई. ती उलटा मेसेज पाठवते, की प्रत्येकवेळी राजा असणं गरजेचं आहे का? भारतीय राज्यघटनेतलं कलम 15 काय सांगतं? तर ते जातीपातीच्या राजकारणापलिकडे जात सर्वधर्मसमभावचा नारा देतं. पण आज आपल्याला त्याचा विसर पडला आहे. आज ग्लोबलायझेशनच्या दुनियेतही अनेक छोट्या छोट्या गावात जातीपातीचं राजकारण खेळलं जातं. दलितांना हीन वागणूक मिळते आहे. आर्टिकल 15 ची गोष्ट अशाच उत्तर प्रदेशातल्या एका गावातली आहे. या गावात आयानची बदली झाली आहे. तो अप्पर पोलीस अधिक्षक आहे. येऊन एक दिवस होतो न होतो तोच गावातल्या एका झाडावर दोन दलित मुलींचे मृतदेह टांगलेले दिसतात. या गावात आजही दलितांना स्पर्श केला जात नाही. तिथे आजही सवर्ण मागास जातीय लोकांचा छळ करताहेत. सवर्णांच्या दबावाखाली सगळी सिस्टीम काम करते आहे. त्यामुळे दलितांचं शोषण होतं आहे. ही बाब अयानसाठी नवी आहे. हा मुलींच्या हत्येचा छडा लावताना जातीपातीचं हे राजकारण किती खोलवर रूजलं आहे याचा अनुभव त्याला येतो. यातून तो खून्यापर्यंत पोचतो का.. तो स्वत: ज्या पोलीस खात्यात काम करतो आहे, ते पोलीस खातेही या जातीच्या राजकारणातून सुटलेलं नाही हे त्याच्या लक्षात येतं. मग तो काय डावपेच खेळतो, त्याच्याबाबत काय राजकारण होतं.. यावर आर्टिकल 15 चित्रपट बेतला आहे. अनुभव सिन्हा आता खूपच रिअलिस्टीक चित्रपट बनवू लागले आहेत. मुल्कनंतरचा त्यांचा हा नवा चित्रपट. हा चित्रपट सत्य घटनांवर बेतलेला आहे असा दावा चित्रपट करतो. कास्टिझमवर बोलताना केवळ ही दरी न दाखवता तो अयान आणि त्याच्या पत्नीकरवी यावर भाष्यही करतो. पोलीसांची हतबलता दाखवतो. राजकीय हस्तक्षेपही उघड करतो. ग्रामीण राजकारणाचे अनेक पैलू यात दिसतात. त्याचवेळी जर एका हुकमी माणसाने योग्य निर्णय घेतले तर सगळी सिस्टिम कशी योग्य होऊ शकते तेही दिसतं. चित्रपट सर्वच तांत्रिक अंगांनी उत्तम झाला आहे. आवर्जून उल्लेख करायला हवा तो कलादिग्दर्शनाचा. पटकथेमध्ये दलित कामगार संपावर गेल्यानंतर उद्भवणारी समस्या यात दाखवली आहे. सीमेवर जवान शहीद होतात. पण माणसांची घाण काढण्यासाठी ड्रेनेजमध्ये उतरणारी मंडळीही अनेक कारणाने मरतात त्याकडे कुणाचं लक्ष नसतं अशा आशयाचे संवादही आपले डोळे उघडतात. छायांकन, पार्श्वसंगीत, संंकलन आदी सर्वच पातळ्यांवर हा चित्रपट चोख झाला आहे. अभिनयाबाबात आवर्जून उल्लेख करायला हवा तो अभिनेता आयुषमान खुरानाचा. आपल्या प्रत्येक चित्रपटातून तो नव्या भूमिकेतून लोकांसमोर येतो. ही भूमिकाही अशीच वेगळी आहे. कर्तव्यदक्ष, नवखा, आपल्या मतांवर ठाम असणारा तरीही संयम न सोडणारा अधीक्षक त्याने उत्तम साकारला आहे. त्याला इतर कलाकारांनीही चांगली साथ दिली आहे. मुद्दा इतकाच आहे की जातीपातीच्या राजकारणावर यापूर्वी अनेक चित्रपट येऊन गेले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात जातीपातीच्या आधारावर होणारं राजकारण चंदेरी दुनियेला नवं नाही. फक्त तो विषय पुन्हा नव्याने मांडला आहे. कमेटं आहे. त्यावर थेट भाष्य आहे. म्हणूनच पिक्चरबिक्चरमध्ये या चित्रपटाला मिळत आहेत तीन स्टार्स. थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघायला हरकत नाही. यातून रुजलेली जातपात दिसेलच पण त्यातून बाहेर पडण्याची ऊर्जाही हा चित्रपट देतो.

महत्त्वाच्या बातम्या

Sameer Wankhede on Kranti Redkar: 'तिच्या नावातच Raidकर, तर मग मी...'; समीर वानखेडेंकडून बायकोचं तोंडभरुन कौतुक, ट्रेलर लाँचदरम्यान जुळ्या मुलींचीही चर्चा
'तिच्या नावातच Raidकर, तर मग मी...'; समीर वानखेडेंकडून बायकोचं तोंडभरुन कौतुक, ट्रेलर लाँचदरम्यान जुळ्या मुलींचीही चर्चा
Chhaya Kadam on Ravi Jadhav: 'नटरंग' नंतर रवी जाधवांचा येतोय नवा सिनेमा, 'फुलवारा'ची जादू भुरळ घालणार; व्हिडिओ शेअर करत छाया कदमांची दाद
'नटरंग' नंतर रवी जाधवांचा येतोय नवा सिनेमा, 'फुलवारा'ची जादू भुरळ घालणार; व्हिडिओ शेअर करत छाया कदमांची दाद
Devendra Fadnavis Dia Mirza Diwali Video Controversy: दिया मिर्झा देशाच्या मोठ्या नेत्या नाहीत, फटकारलं नसेल, मुळात हे प्रकरण न्यायालयात गेलंच नाही : देवेंद्र फडणवीस
दिया मिर्झा देशाच्या मोठ्या नेत्या नाहीत, फटकारलं नसेल, मुळात हे प्रकरण न्यायालयात गेलंच नाही : देवेंद्र फडणवीस
Dia Mirza Diwali Video Controversy: दिया मिर्झाला ट्रोल करणाऱ्या वाचाळ राजकारण्यांना मुंबई हायकोर्टानं झाडलं, डिलीट केलेला व्हिडीओ पुन्हा पोस्ट करण्याचे आदेश
दिया मिर्झाला ट्रोल करणाऱ्या वाचाळ राजकारण्यांना मुंबई हायकोर्टानं झाडलं, डिलीट केलेला व्हिडीओ पुन्हा पोस्ट करण्याचे आदेश

व्हिडीओ

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
Sanjay Raut: अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
Embed widget