Mouni Roy: मौनी रॉयने सांगितला 'तो' भयावह अनुभव; म्हणाली 'त्याने माझा चेहरा धरला, काही समजायच्या आत...'
त्या घटनेनं मला हादरवून टाकलं आणि बऱ्याच काळासाठी मनात भीती निर्माण केली.” असंही तिने सांगितलं.

Mouni Roy Bollywood: बॉलिवूडची मायानगरी ही कित्येकांना भुलवणारी . या मायाजालात अनेकजण हरवतात . काही फसवले जातात तर काहींना विचित्र अनुभवही येतात . अलीकडेच एका अभिनेत्रीने तिला आलेल्या धक्कादायक अनुभवाविषयी मुलाखतीत सांगितलं . टीव्ही पासून ते थेट बॉलीवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) चाहत्यांची मने जिंकत आहे . अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत तिने इंडस्ट्रीत नवीन असताना फिल्म नरेशन करताना एका व्यक्तीने तिच्याशी केलेलं भयानक कृत्य उघड केलं .
'देवो के देव महादेव' मधील सती आणि 'नागिन' मालिकेतील तिच्या दमदार अभिनयामुळे मौनीने घराघरात लोकप्रियता मिळवली .पण या यशाच्या मागे संघर्ष आणि काही कटू आठवणीने दडलेल्या आहेत .याचा खुलासा तिने अलीकडेच अपूर्वा मुखिजा यांच्या 'स्पाइस इट अप ' या शोमध्ये केला .
सीनचा डेमो दाखवताना त्याने चेहरा धरला अन् ..
मौनी म्हणाली, " मी तेव्हा फक्त 21-22 वर्षांची होते. एका ऑफिसमध्ये नरेशनसाठी गेले होते. काही लोक तिथे उपस्थित होते. एका सीनमध्ये दाखवलं होतं की, एक मुलगी स्विमिंग पूलमध्ये पडते आणि बेशुद्ध होते. त्यानंतर हिरो तिचं प्राण वाचवण्यासाठी माउथ टू माउथ सीपीआर देतो.” त्या सीनचं डेमो दाखवताना समोरच्या व्यक्तीने मौनीचं चेहऱ्यावर हात ठेवत प्रत्यक्षात माउथ टू माउथ दाखवण्याचा प्रयत्न केला.
मौनी पुढे सांगते, “हे सगळं काही सेकंदात घडलं. मला समजायलाही वेळ मिळाला नाही की काय झालं. मी एवढी घाबरले की खाली पळत सुटले. त्या घटनेनं मला हादरवून टाकलं आणि बऱ्याच काळासाठी मनात भीती निर्माण केली.” मौनीने त्या व्यक्तीचं नाव घेतलेलं नाही. तो अभिनेता होता, दिग्दर्शक की कास्टिंग एजंट, हे तिने स्पष्ट केलेलं नाही. पण या घटनेनंतर मौनी अधिक सावध झाली आणि स्वतःच्या मर्यादा ठामपणे ठरवल्या.
लवकरच दिसणार डेविड धवनच्या चित्रपटात
मौनी रॉय आज बॉलिवूडमधील लोकप्रिय नाव आहे. ‘नागिन’ आणि ‘देवों के देव महादेव’ सारख्या सुपरहिट मालिकांनी तिला मोठं यश मिळवून दिलं. नंतर ती रणबीर कपूरसोबत ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातही झळकली, जिथे तिची नकारात्मक पण प्रभावी भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. आता मौनी लवकरच डेविड धवन दिग्दर्शित रोमँटिक कॉमेडी ‘है जवानी तो इश्क होना है’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत पूजा हेगडे आणि मृणाल ठाकूरही झळकणार आहेत. हा चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे.






















