Janhit Mein Jaari Trailer Release : नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha), विनोद भानुशाली आणि राज शांडिल्यच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 'जनहित में जारी' (Janhit Mein Jaari) असे या सिनेमाचे नाव आहे. या सिनेमात अनेक सामाजिक विषयांवर भाष्य करण्यात येणार आहे.


'जनहित में जारी' हा सिनेमा 10 जूनला देशभरात प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर रिलीज झाल्याने प्रेक्षक आता सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ट्रेलरवरून हा विनोदी सिनेमा असेल याचा अंदाज येतो. 'जनहित में जारी' सिनेमात एका तरुण मुलीचा प्रवास दाखवण्यात येणार आहे.





जय बसंतू सिंह यांनी 'जनहित में जारी' सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर या सिनेमात नुसरत भरुचाचा दमदार अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमात विजय राज, परितोष त्रिपाठी, टीनू आनंद, बिजेंद्र कला आणि नेहा सराफ महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.


संबंधित बातम्या


KGF 2 Box Office Collection : ‘डॉक्टर स्ट्रेंज’च्या रिलीजनंतरही ‘केजीएफ 2’चाच बोलबाला! चौथ्या आठवड्यातही कमाईच्या बाबतीत मारली बाजी!


Say No To War : 'से नो टू वॉर' गाणं रिलीज; जावेद अख्तर म्हणाले, 'युद्धाच्या काळात अशा गाण्यांची गरज'


Funeral Marathi Movie : चक्क स्मशानभूमीत पार पडला चित्रपटाच्या पोस्टर लाँचिंगचा सोहळा! ‘फनरल’च्या टीमने हाती घेतला नवा उपक्रम!