Salman Ali : इंडियन आयडॉल (Indian Idol) या शोमधून घराघरात पोहचलेला तसेच 10 व्या इंडियन आयडॉल सीझनचा विजेता असलेला पार्श्वगायक सलमान अली (Salman Ali) याने 'मजनू' या मराठी चित्रपटासाठी प्रथमचं मराठीत पार्श्वगायन केले आहे. 'प्रेमाची अनोखी परिभाषा सांगणाऱ्या मजनू चित्रपटासाठी गाण्याचा अनुभव खूप छान होता. जन्मभूमी हरियाणा असली तरी कर्मभूमी महाराष्ट्र आहे. अनेक वर्षांपासून मुंबईत वास्तव असल्याने मराठी भाषेची मला गोडी लागली. मराठी चित्रपटात मला गायची इच्छा होती ती मजनू चित्रपटामुळे माझी पूर्ण झाली, 'असे सलमान अली आवर्जून सांगतो.
"मन बांधलं बांधलं, तुझ्या नावाचं तोरण" असे गाण्याचे बोल आहेत. तर हे गीत गोवर्धन 'दोलताडे यांनी लिहले असून संगीतबद्ध पी. शंकरम् यांनी केले आहे. तर अभिनेता रोहन पाटील आणि अभिनेत्री श्वेतलाना अहिरे यांच्यावर नाशिक येथील कळवण, सापुतारा अशा नयनरम्य परीसरात चित्रित झाले आहे. साऊथचे कॅमेरामन एम. बी. अलीकट्टी हे असून नृत्य दिग्दर्शक साऊथचे हाईट मंजू हे आहेत.
चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे हे आहेत. शिवाजी दोलताडे म्हणाले, की प्रत्येकजन कॉलेजला गेल्या नंतर स्वतःला मजनू समजतो जे लोक चित्रपट पाहतील. त्यांना त्यांच्या कॉलजेच्या दिवसांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. "मजनू" चित्रपटात रसिकांना सस्पेंस, एक्शन, लव्हस्टोरी अशा बऱ्याच गोष्टी पहायला मिळणार आहेत. हा चित्रपट तरुणाईच्या ह्रदयाचा ठाव घेईल असे चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताडे म्हणाले.
हेही वाचा :
- Sher Shivraj : भारतातच नव्हे, तर परदेशातही ‘शेर शिवराज'चा डंका, मराठी चित्रपटाचे शो जगभरात ‘हाऊसफुल’!
- Happy Birthday Ashwini Bhave : ‘लिंबू कलरची साडी’ म्हटलं की डोळ्यांसमोर येणारा चेहरा! जाणून घ्या अभिनेत्री अश्विनी भावेंबद्दल...
- Irsal : 'इर्सल'मध्ये दिसणार माधुरी पवारच्या नखरेल अदा, 'या बया दाजी आलं' गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार!