Mohan Juneja Passes Away : ‘KGF Chapter 2’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाचं यश पाहून चाहते आनंदी झाले आहेत. मात्र, आता ‘केजीएफ 2’ (KGF 2) चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी आली आहे. ‘केजीएफ 2’  फेम अभिनेता मोहन जुनेजा (Mohan Juneja) यांचे आज (7 मे) सकाळी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. बंगळुरू येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यानच अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला.


आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या आणि कॉमेडीने लोकांना हसवणाऱ्या मोहन यांनी आज या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे अवघ्या साऊथ इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. अभिनेते मोहन जुनेजा, यश स्टारर ‘केजीएफ’ आणि ‘केजीएफ 2’ या दोन्ही चित्रपटांत झळकले होते.



‘केजीएफ’मधील भूमिका गाजली!


मोहन जुनेजा यांनी विनोदी कलाकार म्हणून साऊथ इंडस्ट्रीमध्ये खूप काम केले. त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळायची. साऊथ स्तर यशच्या ‘केजीएफ’ आणी ‘केजीएफ 2’ या चित्रपटात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. याच चित्रपटांनी त्यांच्या करिअरला कलाटणी मिळाली होती. त्यांच्या निधनामुळे चाहते देखील शोकाकुल झाले आहेत. चाहते आणि प्रेक्षक सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.






अनेक चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांचे अचानक निघून जाणे हा सर्वांसाठीच एक मोठा धक्का आहे. वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे.


हेही वाचा :


Sher Shivraj : भारतातच नव्हे, तर परदेशातही ‘शेर शिवराज'चा डंका, मराठी चित्रपटाचे शो जगभरात ‘हाऊसफुल’!


Happy Birthday Ashwini Bhave : ‘लिंबू कलरची साडी’ म्हटलं की डोळ्यांसमोर येणारा चेहरा! जाणून घ्या अभिनेत्री अश्विनी भावेंबद्दल...


Irsal : 'इर्सल'मध्ये दिसणार माधुरी पवारच्या नखरेल अदा, 'या बया दाजी आलं' गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार!