एक्स्प्लोर

महाराष्ट्राचा वाघ आला! सर्वत्र 'ठाकरे'चाच फिवर

बाळासाहेब ठाकरे यांचा बायोपिक असलेला 'ठाकरे' चित्रपट आज आपल्या भेटीस आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी 'ठाकरे' चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल आहेत.

मुंबई/पुणे/नागपूर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बायोपिक असलेला 'ठाकरे' चित्रपट आज आपल्या भेटीस आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी 'ठाकरे' चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल आहे. महाराष्ट्रातील बाळासाहेबांच्या चाहत्यांनी तसेच शिवसैनिकांनी अनेक ठिकाणी संपूर्ण चित्रपटगृहांचं बुकिंग केलं आहे. आज सकाळी मुंबईतील वडाळ्याच्या कार्निव्हल चित्रपटगृहात भल्या पहाटे साडेचार वाजता चित्रपटाच्या फर्स्ट डे फर्स्ट शो ला तुडुंब गर्दी झाली होती. या शोसाठी संपूर्ण सिनेमागृह सजवण्यात आलं होतं. पहाटे चार वाजता आधी पूजा करण्यात आली. त्यांनतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुधाने अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत पानसे यांच्या हस्ते चित्रपटाचे उद्घाटन झाले. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शोला सुरुवात झाली. बाळासाहेबांची जन्मभूमी असलेल्या पुण्यातही उत्साह सर्वत्र 'ठाकरे' चित्रपटाचा ज्वर चढला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जन्मभूमी असलेले पुणे शहर तर आघाडीवर आहे. हा चित्रपट शिवसैनिकाना मोफत पाहता यावा यासाठी पुण्यात शिवसैनिंकाकडून पुणे शहरातील विजय टॉकीज, सिटीप्राईड , कोथरुड यासह अजून दोन चित्रपटगृहांमधील ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ बुक करण्यात आला होता. तसेच या शेजपूर्वी ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कारही करण्यात आला. नागपूरात चित्रपटगृह हाऊसफुल्ल नागपूरात आज "संगम अॅडलॅब्स" या सिनेमागृहात शेकडो शिवसैनिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. नागपूर जिल्ह्यातील रामटेक मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी आज शेकडो शिवसैनिकांसह चित्रपटाच्या फर्स्ट डे फर्स्ट शो ला हजेरी लावत चित्रपट पाहिला. नागपुरातील अनेक चित्रपटगृहांबाहेर फटाके फोडून चित्रपटांच्या खेळाला सुरुवात करण्यात आली. वसईत ढोल ताशा पथकाचा जल्लोष वसईच्या कार्निव्हल ड्रिम मॉल या चित्रपटगृहात शिवसैनिकांनी सकाळी 7:45 च्या शोसाठी गर्दी केली होती. चित्रपटाला सुरुवात करण्यापूर्वी खास ढोल ताशा पथक आणून सिनेमाचं स्वागत करण्यात आलं. सिनेमागृहाच्या भोवताली संपूर्ण भगव्या झेंड्यांनी भगवेमय वातावरण निर्माण केले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतरच चित्रपटाच्या खेळाला सुरुवात करण्यात आली. नंदुरबारमध्ये बाळासाहेबांचा ड्यूप्लिकेट नंदुरबार शहरातील नंदुरबार बिजनेस सेंटर मधील मिराज चित्रपटगृहात सकाळपासूनच तुफान गर्दी होती. या चित्रपटगृहातील आजचे सर्व शो हाऊसफुल्ल असल्याचे सांगण्यात आले आहे. चित्रपट पाहायला बाळासाहेबांचा एक चाहता बाळासाहेबांची वेशभूषा करुन आला होता. त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. महाराष्ट्राचा वाघ आला! सर्वत्र 'ठाकरे'चाच फिवर

महत्त्वाच्या बातम्या

Shruti Marathe On Film Rejection: '...कारण तू सुंदर आहेस'; हिंदी सिनेमातून श्रुती मराठेला केलं रिजेक्ट, अभिनेत्रीने सांगितला किस्सा...
'...कारण तू सुंदर आहेस'; हिंदी सिनेमातून श्रुती मराठेला केलं रिजेक्ट, अभिनेत्रीने सांगितला किस्सा...
Singer Gulab Sidhus Firing: भरवस्तीत ठो ठो! प्रसिद्ध गायकाच्या घराबाहेर रात्री फायरिंग; 10-12 गोळ्या झाडल्या, CCTV पोलिसांच्या हाती
भरवस्तीत ठो ठो! प्रसिद्ध गायकाच्या घराबाहेर रात्री फायरिंग; 10-12 गोळ्या झाडल्या, CCTV पोलिसांच्या हाती
Pooja Sawant and Siddhesh chavan: पूजा सावंतचा Vacation Mode On! नवरा ऑस्ट्रेलियातून मुंबईत येताच कपलने केला क्वालिटी टाइम स्पेंड; शेअर केले खास PHOTOS
पूजा सावंतचा Vacation Mode On! नवरा ऑस्ट्रेलियातून मुंबईत येताच कपलने केला क्वालिटी टाइम स्पेंड; शेअर केले खास PHOTOS
Venice Film Festival 2026: व्हेनिसमध्ये डेनमार्कच्या मे-एल-टुकीचा ‘वुमन अननोन’ सर्वोत्कृष्ट, वादग्रस्त इस्रायली फिल्म ‘नाझा’ला स्पेशल ज्युरी पुरस्कार
व्हेनिसमध्ये डेनमार्कच्या मे-एल-टुकीचा ‘वुमन अननोन’ सर्वोत्कृष्ट, वादग्रस्त इस्रायली फिल्म ‘नाझा’ला स्पेशल ज्युरी पुरस्कार

व्हिडीओ

Maharashtra Rain : राज्यभरात बळीराजाच्या स्वागताला वरूणराजा Special Report
Muslim Ganpati Mumbai : मुंबईत गणेशोत्सवात धार्मिक एकोप्यात दर्शन | Special Report ABP Majha
Will Jarange march on Mumbai, or will a solution be found : मुंबईत धडकणार की तोडगा निघणार? | Special Report ABP Majha
Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा
Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohsin Naqvi Team India Asia Cup 2026: मोहसीन नक्वीला स्टेजवर पाहताच स्मृती मानधना माघारी फिरली, टीम इंडियाचा ट्रॉफी घ्यायला नकार, दुबईच्या मैदानात हायव्होल्टेज ड्रामा
मोहसीन नक्वीला स्टेजवर पाहताच स्मृती मानधना माघारी फिरली, टीम इंडियाचा ट्रॉफी घ्यायला नकार, दुबईच्या मैदानात हायव्होल्टेज ड्रामा
MH-CET Exam : सीईटी डेटा लीक अन् सेंटर मॅनेजमेंट प्रकरणाची होणार चौकशी, मुख्यमंत्री फडणवीसांचे FIR आणि फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश
सीईटी डेटा लीक अन् सेंटर मॅनेजमेंट प्रकरणाची होणार चौकशी, मुख्यमंत्री फडणवीसांचे FIR आणि फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश
Mohsin Naqvi Team India Asia Cup 2026: टीम इंडियाच्या मुलींकडून सर्वांदेखत पाणउतारा, मोहसीन नक्वी अवाक होऊन पाहतच राहिला
टीम इंडियाच्या मुलींकडून सर्वांदेखत पाणउतारा, मोहसीन नक्वी अवाक होऊन पाहतच राहिला
BJP Parag Shah: भाजप आमदार पराग शाहांचा भिकाऱ्याच्या वेषातील रस्त्यावर फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
भाजप आमदार पराग शाहांचा भिकाऱ्याच्या वेषातील रस्त्यावर फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला, चार जणांचा मृत्यू; सहा वर्षांच्या मुलालाही गोळी लागली
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला, चार जणांचा मृत्यू; सहा वर्षांच्या मुलालाही गोळी लागली
स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड युनायटेड किंगडमपासून वेगळे होणार? स्वातंत्र्याच्या निर्णयावर सार्वमत होण्याची शक्यता
स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड युनायटेड किंगडमपासून वेगळे होणार? स्वातंत्र्याच्या निर्णयावर सार्वमत होण्याची शक्यता
Manoj Tiwari: भाजप खासदार मनोज तिवारींनी BRICS वर असा एक फोटो शेअर केला की तो डिलीट करून माफी मागायची वेळ आली, नेमकं घडलं तरी काय?
भाजप खासदार मनोज तिवारींनी BRICS वर असा एक फोटो शेअर केला की तो डिलीट करून माफी मागायची वेळ आली, नेमकं घडलं तरी काय?
Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं; कोणालाच काही कळेना, चाहते सुद्धा हैराण अन् सामना सुरु होण्याची वेळ सुद्धा लांबली
पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं; कोणालाच काही कळेना, चाहते सुद्धा हैराण अन् सामना सुरु होण्याची वेळ सुद्धा लांबली
Embed widget