एक्स्प्लोर

गायक अदनान सामीला पद्मश्री पुरस्कार देण्यास मनसेचा विरोध

मूळ पाकिस्तानी गायक अदनान सामीला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराला मनसेने विरोध केला आहे.

मुंबई : गायक अदनान सामीला जाहीर झालेल्या पद्मश्री पुरस्काराला मनसेने विरोध केला आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करुन अदनानला जाहीर झालेल्या पुरस्काराचा मनसेकडून तीव्र शब्दात निषेध केला आहे. मूळ भारतीय नागरिक नसलेल्या अदनान सामीला भारत सरकारने कोणताही पुरस्कार देऊ नये, हे मनसेच ठाम मत असल्याचं त्यांनी ट्विट केलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. एकूण 21 जणांचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या बीजमाता राहिबाई पोपेरे आणि अहमदनगरच्या आदर्श गाव हिवरेबाजारचे माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांना पद्मश्री जाहीर जाहीर झाला आहे. अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि जॉर्ज फर्नांडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. एकूण 118 जणांना पद्मश्री, 16 जणांना पद्मभूषण आणि 7 जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यातच पाकिस्तानी गायक अदनान सामीलाही पद्मश्री जाहीर करण्यात आला आहे. अमेय खोपकर यांच ट्विट - अदनान सामीला विरोध करणारं ट्विट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केलं आहे. "मूळ भारतीय नागरिक नसलेल्या अदनान सामीला भारत सरकारने कोणताही पुरस्कार देऊ नये, हे मनसेच ठाम मत आहे. त्यामुळे त्याला बहाल केलेल्या पद्मश्री पुरस्काराचा मनसेकडून तीव्र शब्दात निषेध. अदनान सामीला जाहीर झालेला पद्म पुरस्कार त्वरित रद्द करण्यात यावा ही मनसेची मागणी आहे." सुरेश वाडकर यांना पद्मश्री मिळाल्याचा आनंद साजरा - ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनाही आज पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यावर आनंद व्यक्त करत खोपकर म्हणाले, "सुरेश वाडकर यांना पद्मश्री मिळाल्याचा आनंद साजरा करतोय, तोच आनंदावर थोडं विरजण पडलं. अदनान सामीला दिलेल्या पद्मश्रीमुळे. 2015 मध्ये म्हणजे मोदींच्याच काळात त्याला भारतीय नागरिकत्व मिळालं आणि लगेच चार वर्षात त्याला पद्मश्रीही बहाल केला. त्याला एवढं लिफ्ट करण्याचं कारण काय?, असा प्रश्नही यावेळी उपस्थित केला आहे." Rahibai Popere | बीजमाता राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री | ABP MAJHA
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rajpal Yadav Dholis Virat Kohli Favourite Movie: तिहार तुरुंगात शिक्षा भोगून आलेल्या राजपाल यादवचा खुद्द विराट कोहलीही फॅन; वारंवार पाहतो 'हा' सिनेमा
तिहार तुरुंगात शिक्षा भोगून आलेल्या राजपाल यादवचा खुद्द विराट कोहलीही फॅन; वारंवार पाहतो 'हा' सिनेमा
Dhurandhar 2 Actor in Rishabh Shetty Film: 'धुरंधर 2' मधील खलनायकाची चांदी; दिग्दर्शक रिषभ शेट्टीच्या ऐतिहासिक चित्रपटात संधी, 'ही' भूमिका साकारणार
'धुरंधर 2' मधील खलनायकाची चांदी; दिग्दर्शक रिषभ शेट्टीच्या ऐतिहासिक चित्रपटात संधी, 'ही' भूमिका साकारणार
'पुरुष ते स्त्रीपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता..'; भारतीय क्रिकेटरच्या लेकीची मोठी शस्त्रक्रिया, Emotional पोस्ट शेअर
'पुरुष ते स्त्रीपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता..'; भारतीय क्रिकेटरच्या लेकीची मोठी शस्त्रक्रिया, Emotional पोस्ट शेअर
Mamta Kulkarni Viral: महामंडलेश्वरपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा बॉलिवूड लूक; साध्वी बनलेली ममता गोव्यात फिरताना दिसताच ट्रोल, VIDEO
महामंडलेश्वरपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा बॉलिवूड लूक; साध्वी बनलेली ममता गोव्यात फिरताना दिसताच ट्रोल, VIDEO

व्हिडीओ

Satara ZP | साताऱ्यात करामती, अडचणीत महायुती? Special Report
Ashok Kharat Nashik | भोंदूबाबा अशोक खरात नेमका कसा अडकला? Special Report
Ashok Kharat | रिमोटवरचा साप नाचवून खरातने भक्तांना घाबरवलं Special Report
Neelam Gorhe on Satara : सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करा, उपसभापतींचे निर्देश
Shambhuraj Desai On Anil Parab : उगाच डिवचू नका, आम्ही हतबल आहोत असं समजायचं कारण नाही - देसाई

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरातची ती चाल आणि इथेच सगळे फसले; राजकारणी, बडे अधिकारी, कलाकार सगळे भोंदूबाबाला भेटायला पोहोचले!
अशोक खरातची ती चाल आणि इथेच सगळे फसले; राजकारणी, बडे अधिकारी, कलाकार सगळे भोंदूबाबाला भेटायला पोहोचले!
 Colombia Plane Crash: कोलंबियात मोठी दुर्घटना, 110 जवानांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान उड्डाण घेताच तीन किलोमीटरवर क्रॅश   
कोलंबियात मोठी दुर्घटना, 110 जवानांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान उड्डाण घेताच क्रॅश
Bacchu kadu: बच्चू कडूंनी सरकारी कार्यालयावर फेकले कांदे; रस्त्यावरच भरवल्या पंगती, अधिकाऱ्यांशी फोनवरुन चर्चा
बच्चू कडूंनी सरकारी कार्यालयावर फेकले कांदे; रस्त्यावरच भरवल्या पंगती, अधिकाऱ्यांशी फोनवरुन चर्चा
Tamil Nadu NDA Seat Sharing : तामिळनाडूत एनडीएचं जागा वाटप ठरलं, भाजप 234 पैकी किती जागा लढवणार? आकडेवारी समोर
तामिळनाडूत एनडीएचं जागा वाटप ठरलं, भाजप 234 पैकी किती जागा लढवणार? आकडेवारी समोर
Rahul Gandhi : इराण युद्ध आणि तेल संकटावर मोदींनी ट्रम्पच्या विरोधात एक शब्दही उच्चारला नाही; राहुल गांधींची टीका
इराण युद्ध आणि तेल संकटावर मोदींनी ट्रम्पच्या विरोधात एक शब्दही उच्चारला नाही; राहुल गांधींची टीका
Eknath Shinde and Devendra Fadnavis: साताऱ्यातील निवडणुकीवरुन भाजप-शिंदे गटात धुसफूस, एकनाथ शिंदे मध्यरात्री वर्षा बंगल्यावर पोहोचले, देवेंद्र फडणवीसांसोबत नेमकी काय चर्चा झाली?
एकनाथ शिंदे मध्यरात्री वर्षा बंगल्यावर पोहोचले, देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा, एसपी तुषार दोशींना अभय मिळणार?
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प म्हणाले पाच दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करणार नाही, इराणच्या मीडियाकडून ट्रम्प यांची खिल्ली, नेमकं काय घडलं?
ट्रम्प म्हणाले 5 दिवस ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करणार नाही, इराणच्या मीडियाकडून खिल्ली, इराणच्या मीडियात काय चर्चा?
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मार्च 2026 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मार्च 2026 | सोमवार
Embed widget