एक्स्प्लोर

"लानत है उनपर, जिनके पास दानत नहीं है", पूरग्रस्तांकडे पाठ फिरवणाऱ्या बॉलिवूडकरांवर मनसेची टीका

एकीकडे मराठी कलाकार राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले. सगळ्यांना मदतीसाठी आवाहन केलं. मात्र त्याचवेळी महाराष्ट्र ही कर्मभूमी असलेल्या हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांनी पूरग्रस्तांकडे पाठ फिरवली. याच मुद्द्यावरुन अमेय खोपकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे निशाणा साधला.

मुंबई : कोल्हापूर आणि सांगलीमधील पूरग्रस्तांना सामान्यांपासून मराठी कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला आहे. परंतु यात बॉलिवूड कलाकार गायब असल्याची टीका मनसेने केली आहे. 'लानत है उनपर, जिनके पास दानत नहीं है,' असं म्हणत महाराष्ट्र चित्रपटसेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी बॉलिवूड कलाकारांवर टीका केली आहे. एकीकडे मराठी कलाकार राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले. सगळ्यांना मदतीसाठी आवाहन केलं. मात्र त्याचवेळी महाराष्ट्र ही कर्मभूमी असलेल्या हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांनी पूरग्रस्तांकडे पाठ फिरवली. याच मुद्द्यावरुन अमेय खोपकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे निशाणा साधला. अमेय खोपकर यांनी पुरानंतर समस्त मराठी कलाकारांनी दाखवलेली आपुलकी आणि मनाच्या मोठेपणाचं कौतुक केलं. तर त्याचवेळी 'लानत है उनपर, जिनके पास दानत नहीं है,' असं म्हणत हिंदी कलाकारांवर टीका केली. ते लिहितात, "महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी आहे असं मुलाखतींमधून जे सांगतात ते बॉलिवूड कलाकार या संकटकाळात कुठे होते? ज्या प्रेक्षकांच्या जीवावर आपल्या तुंबड्या भरतात तेच प्रेक्षक जेव्हा दु:खात आहेत तेव्हा त्यांना सावरण्यासाठी पुढे का आले नाहीत? एकमेकांच्या टुकार सिनेमांचं प्रमोशन करण्यासाठी उठसूठ व्हिडीओ बाईट पोस्ट करणारे हिरो, यांना मदतीचं आवाहन करणारा एक साधा व्हिडीओही टाकता आला नाही? लानत है उनपर, जिनके पास दानत नहीं है... कुणी काय करावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न असं म्हणतात. पण इथे प्रश्न गंभीर आहे, स्वत:ची मसीहा अशी प्रतिमा पडद्यावर रंगवणाऱ्या या स्टार्सना नेमका स्वत:च्या कर्मभूमीचाच कसा विसर पडतो हाच प्रश्न सतावतोय, आणि संतापही येतोय. असो, आम्ही आमचं काम करत राहू. आमच्या मातीतल्या मायेच्या माणसांसाठी सदैव झटत राहू, यात कधीच खंड पडणार नाही. अमेय खोपकर अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad pawar Birthday : शरद पवारांचा 84 वा वाढदिवस, पुतणे अजित पवारांकडून काकांना खास शुभेच्छा, आज दिल्लीत भेट होणार?
शरद पवारांचा 84 वा वाढदिवस, पुतणे अजित पवारांकडून काकांना खास शुभेच्छा, आज दिल्लीत भेट होणार?
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
Valmik Karad : पवनऊर्जा कंपनीला 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेवर गुन्हा दाखल
वाल्मिक कराड, विष्णू चाटे अन् सुदर्शन घुलेवर गुन्हा नोंद, खंडणी प्रकरणी पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्याची तक्रार
Anganwadi Yatra Sindhudurg : आंगणेवाडीच्या भराडी देवीने कौल दिला, जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
आंगणेवाडीतील भराडी देवीच्या जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Parbhani Protest : परभणीतील घटनेत छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं मोठं नुकसानSanjay Rathod on Fake Report Card : मी नापास होऊच शकत नाही; जनतेसाठीच काम केलंPlaces of worship hearing in SC : हिंदू संघटनांकडूनच प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हानMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 12 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad pawar Birthday : शरद पवारांचा 84 वा वाढदिवस, पुतणे अजित पवारांकडून काकांना खास शुभेच्छा, आज दिल्लीत भेट होणार?
शरद पवारांचा 84 वा वाढदिवस, पुतणे अजित पवारांकडून काकांना खास शुभेच्छा, आज दिल्लीत भेट होणार?
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
Valmik Karad : पवनऊर्जा कंपनीला 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेवर गुन्हा दाखल
वाल्मिक कराड, विष्णू चाटे अन् सुदर्शन घुलेवर गुन्हा नोंद, खंडणी प्रकरणी पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्याची तक्रार
Anganwadi Yatra Sindhudurg : आंगणेवाडीच्या भराडी देवीने कौल दिला, जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
आंगणेवाडीतील भराडी देवीच्या जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
Kurla Bus Accident: बेस्टचालक संजय मोरेचा पोलीस चौकशीत मोठा गौप्यस्फोट, सातत्याने एकच गोष्ट सांगत राहिला....
बेस्टचालक संजय मोरेचा पोलीस चौकशीत मोठा गौप्यस्फोट, सातत्याने एकच गोष्ट सांगत राहिला...
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
Mhada News : गुड न्यूज, म्हाडा मुंबईत पुढील 5 वर्षात अडीच लाख घरं बांधणार, घरांच्या किंमतीबाबत मोठी अपडेट 
मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार, म्हाडाचं पाच वर्षात अडीच लाख घरं बांधण्याचं नियोजन 
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
Embed widget