एक्स्प्लोर
VIDEO : 'सैराट'मधील लक्षात न येणारी चूक

मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या 'सैराट' सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरश: याड लावलं आहे. अनेकांना या सिनेमातील प्रत्येक डायलॉगही पाठ असतील. इतकंच काय बऱ्याच जणांनी हा चित्रपट एकापेक्षा जास्तवेळा पाहिला असेल. पण 'सैराट'मधील एक चूक कोणाच्या लक्षात आली का? खरंतर सिनेमा आवडीचा असेल तर रसिक मग्न होऊन पाहतो. उत्सुकता वाढवणाऱ्या दृश्यांमुळे बऱ्याचदा त्यातील चुका लक्षात येत नाहीत. परंतु काहींच्या नजरेतून या चुका सुटत नाहीत. 'सैराट'मधील चूक दाखवणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. आर्ची शेतात जाताना परशाच्या घराजवळ थांबते आणि परशा, सल्या, लंगड्या बाळ्या तिला भेटण्यासाठी शेतात जातो, या संपूर्ण दृश्यात सल्याचा शर्ट बदललेला दिसतो. सल्याने बदलेला शर्ट आणि आर्ची बुलेटवरुन कॉलेजमध्ये येते त्या सीनमध्ये पराशाने परिधान केलेला शर्ट सारखाच आहे पाहा व्हिडीओ
आणखी वाचा























